Accident News Saam tv
देश विदेश

Accident: राजस्थानच्या पालीमध्ये भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; 7 भाविक ठार, 25 जखमी

या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला.

Shivani Tichkule

राजस्थान - पाली जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून, त्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पाली जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस (Police) स्टेशन परिसरात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेकरू ट्रॅक्टर ट्रॉलीतून जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र सुमेरपूरजवळ भाविकांवर काळाने झडप घातली. भरधाव वेगात आलेल्या ट्रॉलीने ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

हे देखील पाहा -

जखमींना शिवपूर आणि सुमेरपूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात बळी पडलेले सर्व भाविक गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पंतप्रधान कार्यालयानेही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पीपंतप्रधान कार्यालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजस्थानमधील पाली येथे झालेला अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दु:खाच्या प्रसंगी आमच्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पाली जिल्ह्यातील रामदेवरा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या अनेक भाविकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची बातमी दुःखद असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. या दु:खात मृतांच्या आत्म्यास शांती मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT