Rajasthan Breaking News Saam TV
देश विदेश

Rajasthan News: भयंकर! साखळी तुटल्याने लिफ्ट १८०० फूट खोल खाणीत कोसळली; १४ जण अडकले, बचावकार्य सुरू

Rajasthan Breaking News : राजस्थानमधील झुंझुनू येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या (HCL) कोलिहान खाणीत लिफ्टची साखळी तुटली. त्यामुळे १४ अधिकारी खाणीत अडकून पडले.

Satish Daud

राजस्थानमधील झुंझुनू येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. खेत्री परिसरात असलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या (HCL) कोलिहान खाणीत लिफ्टची साखळी तुटली. त्यामुळे दक्षता पथकासह कंपनीचे १४ अधिकारी खाणीत अडकून पडले. त्यांची सुटका करण्यासाठी बचावपथकाचे प्रयत्न सुरू आहे.

आतापर्यंत तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही बरेच लोक खाणीत अडकून पडले असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांच्या पथकाचे पाचारण करण्यात आले आहे. सर्व लोक सुमारे १८०० फूट खोल खाणीत अडकल्याची माहिती आहे.

खाणीत अडकून पडलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून अन्नाच्या पाकिटांसह आवश्यक औषधींचा पुरवठा करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, हिंदुस्थान कॉपरच्या कोलिहान खाणीमध्ये १३ मे २०२४ पासून तपासणीचे काम सुरू आहे.

मंगळवारी (ता. १४) खाणीची पाहणी करण्यासाठी कोकाटा येथील दक्षता पथक आले होते. यातील १४ जण लिफ्टच्या सहाय्याने खाणीत उतरले. कामाची पाहणी केल्यानंतर वर येत असताना अचानक लिफ्टची साखळी तुटली. त्यामुळे सर्वजण लिफ्टसहित खोल खाणीत कोसळले.

या दुर्घटनेचे वृत्त समजताच सर्वत्र घबराट पसरली. याची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू झाले. १० तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत १५ पैकी तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. बचावकार्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच सर्वांना बाहेर काढण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाणा ते चिखली रस्त्यावर डिझेलसाठी वाहनाच्या रात्रभर रांगा

Petrol Diesel Price Today : पेट्रोल डिझेलच्या किमतीत दहा दिवसात तिसऱ्यांदा वाढ, सर्वसामान्यांना मोठा फटका; आजचा दर किती ? जाणून घ्या

मोठी बातमी! 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक दीपकेंना ठार मारण्याच्या धमक्या

Quick Breakfast Recipes : ना गॅसची गरज ना जास्त वेळ, झटपट बनणाऱ्या 'या' ५ रेसिपी नाश्त्याला ट्राय करा

Pravin Tarde- Deool Band 3 : राघव शास्त्रीला स्वामींचा अमेरिकेत फोन; 'देऊळ बंद ३' येणार, गश्मीर महाजनीची दमदार एन्ट्री | VIDEO

SCROLL FOR NEXT