rajasthan crime  Saam Digital
देश विदेश

Rajasthan Firing : राजस्थान हादरलं! दिवसाढवळ्या महिलेची गोळ्या झाडून हत्या

Rajasthan Firing News in Marathi : राजस्थानच्या फलोदी येथील एका महिलेची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे.

Vishal Gangurde

Rajasthan Latest News :

राजस्थानातून धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या फलोदी येथील एका महिलेची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थानच्या फलोदीमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेची हत्या करून पळ काढला आहे. महिलेवर गोळीबार करणाऱ्या आरोपींचा चेहरा सीसीटीव्ही कैद झाला आहे. या महिलेची हत्या तिच्या नवऱ्यानेच केली असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला राजस्थानमध्ये दुकान चालवत होते. रविवारी तिच्या दुकानात शिरून हत्या केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यामुळे पोलिसांनी या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले.

नेमकं काय घडलं?

गोळीबारआधी महिला आणि नवऱ्यामध्ये वाद झाला. त्यानंतर नवरा गोळीबार करून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिला गेल्या अनेक दिवसांपासून पतीपासून विभक्त राहत होती. दोघांमधील वाद कोर्टात सुरु होता. कोर्टात वाद पोहोचल्यामुळे ही महिला मुलांसोबत एकटी राहत होती. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस सीसीटीव्हीचा आधार घेत आहे. त्याचबरोबर शहरात नाकाबंदी सुरु केली आहे.

हरियाणा INLD चे अध्यक्ष नफे सिंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या

हरियाणातही गोळाबारीची घटना घडली आहे. हरियाणामध्ये माजी आमदार नफे सिंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नफे सिंह हे कारमधून प्रवास करताना त्यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला.हल्लेखोरांनी एकूण ४०-५० राऊंड फायर केले आहेत. या घटनेने हरियाणातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT