Rajastan Crime News Saam Digital
देश विदेश

Rajasthan Crime News : पत्नीला दुचाकीला बांधून पतीने गावभर फरफटत नेलं; कारण ऐकून तळपायाची आग जाईल मस्तकात

Rajasthan Crime : राजस्थानमधील नागौरी जिल्ह्यात एका मद्यपी पतीने आपल्या पत्नीला मारहाण करून दुचाकीला बाधून गावभर फरफटत नेलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Sandeep Gawade

राजस्थानच्या नागौरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. निर्दयी पतीने पत्नीला मारहाण करून दुचाकीला बांधून गावभर फरफटत नेलं. मात्र नेहमीप्रमाणे व्हिडिओ काढण्यात मग्न असलेल्या गर्दीतून एकही व्यक्ती मदतीसाठी धावून आली नाही. या गर्दीतूनच कोणतरी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत महिलेच्या पतीला अटक केली आहे. प्रेमराम मेघवाल (वय ३२) असं या निर्दयी पतीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने तिच्या जैसलमेरमध्ये राहणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र काही केल्या पतीने तिला भेटण्याची परवानगी दिली नाही. तिने हट्ट धरला आणि तिच्या बहिणीकडे जाण्याचा विचार केला. त्यामुळे संतापलेल्या प्रेमराम तिला जबर मारहाण केली. इतकचं नाही तर तिला फरफटत ओढून नेलं आणि दुचाकीच्या मागे बांधल. दुचाकी सुरू केली आणि तुला गावभर फरफटत नेलं.

प्रेमराम तिला गावभर फरफटत नेत असताना संपूर्ण गाव बघ्याची भूमिका घेत होतं. काहीजण तर व्हिडिओ काढण्यात मग्न होते. हा प्रकार पाहण्यासाठी गावातील लोकांनी गर्दीही केली होती. मात्र या गर्दीतून एकही व्यक्ती त्या महिलेच्या मदतीला धावून आली नाही. उलट हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायल केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. मात्र त्या महिलेने या घटनेची तक्रार अद्याप पोलीस स्थानकात दिलेली नाही.

पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या पतीला अटक केली आहे. तो नशेच्या आहारी गेला असून त्यातून हे कृत्य झालं आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता ATM मधून काढता येणार PF चे पैसे; पेन्शनवर परिणाम होणार? वाचा नवीन नियम

घराबाहेर पडताय सावधान! महाराष्ट्र 'रेड झोन'मध्ये; काय करावे? काय करू नये?

Parliament Special Session: महिला आरक्षणासह सरकार सादर करणार दोन महत्त्वाची विधेयक

Pune Crime News: पुणे हादरलं! गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Old Bedsheet Reuse Ideas: घरातील जुन्या चादरी फेकून देऊ नका, 'असा' करा त्याचा वापर, घराला येईल नवीन शोभा

SCROLL FOR NEXT