Crime Saam
देश विदेश

Crime: मालकीण बाथरूममध्ये आंघोळीला गेली, मोलकरीण बेडरूममध्ये शिरली, कपाटाचे दार उघडताच...

Domestic Help Arrested for Theft: घरातील मोलकरीणच चोरी करताना रंगेहाथ पकडली गेली आहे. ही घटना सुरजवाग कॉलनीतील बन्सल वॉटर सप्लायरचे मालक विष्णू बन्सल यांच्या घरी घडली.

Bhagyashree Kamble

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील कामण शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातील मोलकरीणच चोरी करताना रंगेहाथ पकडली गेली. ही घटना सुरजवाग कॉलनीतील बन्सल वॉटर सप्लायरचे मालक विष्णू बन्सल यांच्या घरी घडली. आरोपी महिलेचे नाव बबिता जाटव असून, ती गेल्या अडीच वर्षांपासून बन्सल कुटुंबीयांकडे मोलकरीण म्हणून काम करत होती.

ज्योती बन्सल यांनी सांगितले की, बबिका जाटव ही कामण येथील बडा मोहल्ला येथील रहिवासी आहे. ती गेल्या अडीच वर्षांपासून त्यांच्या घरात सफाई कामगार म्हणून काम करत होती. दररोजप्रमाणे ती सकाळी बन्सल यांच्याकडे कामाला गेली. ज्याती बन्सल ११ वाजता आंघोळीला गेल्या. मग त्यांना खोलीतून आवाज ऐकू आला. जेव्हा त्या पटकन बाहेर आल्या, तेव्हा त्यांना कपाट उघडं दिसलं. मोलकरीण तेव्हा कपाटाजवळ उभी होती.

ज्योती बन्सल यांनी तिला रंगेहाथ पकडलं. तिच्या कपड्यांमधून सुमारे ५५ रूपये सापडले. यानंतर बन्सल कुटुंबाने यासंदर्भात माहिती कामन पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून बबिताला ताब्यात घेतलं. सध्या पोलीस बबिताची चौकशी करीत आहेत.

विष्णू बन्सल यांनी सांगितलं की, त्यांच्या घरातून याआधीही अनेकदा पैसे चोरीला गेले होते. यापूर्वीही त्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र, ज्योती बन्सल यांनीच आरोपीला चोरी करतानाच रंगेहाथ अटक केली आहे. पोलीस आता बबिताची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

Crispy Corn Bhaji: पावसाळ्यात चहासोबत बनवा खमंग क्रिस्पी कॉर्न भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

SCROLL FOR NEXT