Who Will Be CM of Rajasthan Saam TV
देश विदेश

Who Will Be CM of Rajasthan: UP नंतर राजस्थानमध्येही 'योगी' होणार मुख्यमंत्री; अनेक वर्षांच्या राजकीय तपाचं फळ मिळणार?

Balaknath Yogi: काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय. एकंदर आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ruchika Jadhav

Balaknath Yogi:

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, राजस्थानमध्ये भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं दिसतंय. भाजप सध्या १११ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय. तर काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय. एकंदर आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह मुख्यमंत्री पदासाठी काही नावांची चर्चा देखील जोर धरू लागली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या राजस्थानमध्ये मोठा चेहऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आल्याचे दिसत आहे. वसुंधरा यांच्यासह मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत गजेंद्र सिंह रेखावत, अर्जुन राम मेघवाल आणि सतीश पुनिया यांची नावेही चर्चेत आहेत. तसेच सीपी जोशी यांच्या नावाचीही मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होतेय.

पुढचे मुख्यमंत्री योगी?

बाबा बालकनाथ योगी यांना तिजार मतदारसंघातून मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाबा बालकनाथ योगी यांच्या नावाचीही सर्वसामान्यांमध्ये मोठी चर्चा होत आहे. योगी विद्यमान खासदार आहेत. भाजपने त्यांना विधानसभा लढवण्यस सांगितले होते.

या आधी यूपीमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदाचा मान देऊन विजय मिळवला आहे. त्यामुळे राजस्थानध्येही हाच फॉर्म्यूला वापरला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. बाबा बालकनाथ योगी हे अलवरयेथील रहिवासी आहेत. ते रोहतक येथील नाथ संप्रदायाच्या मठाचे महंत आहेत. तसेच योगी आदित्यानाथ यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT