Rajasthan Assembly Election Congress Second List saam tv
देश विदेश

Assembly Elections 2023: राजस्थान निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी

Rajasthan Assembly Election: राजस्थान निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी

Satish Kengar

Rajasthan Assembly Election Congress Second List:

आगामी राजस्थान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय प्रमोद जैन यांच्यासह ४३ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. बहुतांश मंत्र्यांना तिकीट देण्यात आले असले तरी दुसऱ्या यादीतही मंत्री शांती धारिवाल आणि महेश जोशी यांना तिकीट मिळालेले नाही.

बांसवाडामधून मंत्री अर्जुन बामनिया, डीग कुम्हेरमधून मंत्री विश्वेंद्र सिंह, सांचोरमधून मंत्री सुखराम बिश्नोई, बेरमधून मंत्री भजनलाल जाटव आणि असिंदमधून मंत्री रामलाल जाट यांना तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या यादीत ३३ नावे जाहीर करण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्री गेहलोत आणि विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष सीपी जोशी यांना तिकीट देण्यात आले होते.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नव्या चेहऱ्यांऐवजी विद्यमान आमदारांनाच संधी

राजस्थानमध्ये काँग्रेस नव्या चेहऱ्यांऐवजी विद्यमान आमदारांवर अवलंबून आहे. काँग्रेसने ३३ उमेदवारांच्या पहिल्या यादीत २९ आमदारांना तिकीट दिले. तसेच ४३ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत ३६ आमदारांना तिकीट देण्यात आले. (Latest Marathi News)

तर पक्षाच्या सर्वेक्षण अहवालात पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या विद्यमान आमदारांची ५० टक्के तिकिटे कापण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सरकार वाचवण्यासाठी साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.

आतापर्यंतच्या यादीत गेहलोत यांच्या इच्छेनुसार तिकिटे दिली जात आहे, असं दिसत आहे. त्याचप्रमाणे सचिन पायलटलाही प्राधान्य देण्यात आले आहे. पायलट गटातील बहुतांश मंत्री आणि आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज अनौपचारिक संवाद साधताना सांगितले की, सर्वेक्षणावर आपला फारसा विश्वास नाही आणि आमदारांविरोधात नाराजी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Late periods causes: मार्च महिन्यात मासिक पाळी का येते उशीरा? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

Maharashtra Live News Update : बुलढाणातील चिखलीत रेणुका देवीची वहन मिरवणूक सुरू; हजारो भाविकांची गर्दी

Mosquito Solution: ना कॉइल, ना स्प्रेची गरज, २ मिनिटांत डास होतील गायब; वाचा सोपी ट्रिक

सोलापूर-धुळे महामार्ग जाम, 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा|VIDEO

Healthy Skin Tips: पिंपल्स आणि ओपन पोर्सपासून सुटका हवी? मग न विसरता या ७ गोष्टी प्रत्येक मुलीने नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT