क्रुझर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

क्रुझर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

राजस्थान मधील नागौर या ठिकाणी मंगळवारी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागौर : राजस्थान मधील नागौर Nagaur Rajasthan या ठिकाणी मंगळवारी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. नागौर जिल्ह्यात श्रीबालाजी परिसरात ट्रक truck आणि क्रुझरमध्ये cruiser मोठा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना उपचाराकरिता तात्काळ रुग्णालयात hospital दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस Police आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. त्यांनी जखमींना उपचाराकरिता तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, पावणे ८ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. नागौर Nagaur जिल्ह्यामधील श्रीबालाजी परिसरात बायपासवर हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझरमध्ये जवळपास १७ प्रवासी प्रवास करत होते. सकाळच्या सुमारास या क्रुझरची आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की, क्रुझर गाडीचा संपूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

अपघातात ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर ३ रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचाराकरिता बिकानेर या ठिकाणी रुग्णालयात रेफर कऱण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती पोलीस घेत आहेत. आणि पुढील तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या वित्तीय समितीवरून पुन्हा वाद, आयुक्त नगरसेवक आमने-सामने

Shocking : लग्नाला मुलगी मिळेना, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT