Raja Raghuvanshi Case  Saam tv
देश विदेश

Raja Raghuvanshi Case : प्रेम राजवर होतं, मग राजाशी लग्न का केलं? सोनम रघुवंशीच्या सासूचा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

Sonam raja raghuvanshi : राजा रघुवंशी प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. या घटनेवर राजा रघुवंशीच्या आईने मोठा खुलासा केला आहे.

Vishal Gangurde

Indore Couple Case Latest Update: राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. सोनमने लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच बॉयफ्रेंडच्या साथीने राजाची हत्या घडवून आणली. याच राजा सूर्यवंशी हत्याकांडाने देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात आता राजाची आई उमा रघुवंशीने मोठा खुलासा केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, राजाची आई उमा सूर्यवंशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. उमा रघुवंशी यांच्या म्हणण्यानुसार, सोनमला मंगळ दोष आहे. तिला मंगळ दोष असल्यामुळे सोनमने माझा मुलगा राजासोबत लग्न केलं. राजाची हत्या करून राजला खूश करण्याचा सोनमचा प्लान होता. पंडितांच्या मते, मंगळ दोष असलेला व्यक्ती जर दुसऱ्या मंगळ दोष असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केलं, तर त्यानंतर मंगळ दोष संपतो.

उमा पुढे म्हणाल्या, 'सोनमला पैशांची गरज होती, तर तिने आधीच सांगायला पाहिजे होते. तिला राज आवडत होता. तर तिच्या कुटुंबाशी आम्ही बोललो असतो. माझ्या मुलाच्या हत्येत सामील असलेल्या लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे. या संपूर्ण हत्याकांडात आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो. पोलिसांनी सोनमची कसून चौकशी केली पाहिजे. त्यानंतर या हत्याकांडाचा पर्दाफाश केला पाहिजे'.

राजा रघुवंशी आणि सोनमच्या दोन्ही कुटुंबानी लग्नासाठी सहमती दर्शवली होती. सोनमची आई संगिता यांनी सांगितलं की, 'लग्न होण्याआधी दोन्ही कुटुंबातील सदस्य अनेकदा भेटले. राजाकडून सोनमवर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता'. दुसरीकडे सोनमच्या सासूने मोठा दावा केला आहे. 'सोनमला मंगळ दोष होता. मात्र, राजाला मंगळ नव्हतं. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि गैर-मंगळ असलेल्या व्यक्तीने लग्न केल्याने दोघांच्या आयुष्यात वैवाहिक समस्या निर्माण होते. दोघांची कुंडली जुळल्यानंतर कुटुंबीयांच्या सहमतीने लग्न होतं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टमध्येच बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट झाली, KISS करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Viral Video: होणाऱ्या नवऱ्याला पाहताच मंडपात नवरीच्या अश्रूंचा पूर; लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Motyacha Bangdya Designs : नऊवारी अन् पैठणीवर शोभून दिसतील मोत्याच्या बांगड्या, 'या' लेटेस्ट सुंदर डिझाइन्स एकदा पाहाच

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, ९ वर्षांच्या मुलासमोरच घडला थरार

Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT