Maharashtra Rain News IMD Alert Saam TV
देश विदेश

Heavy Rain Alert : महाराष्ट्रासह ९ राज्यांत आज पावसाचा इशारा; वाचा कुठे कुठे कोसळणार पाऊस

Weather Update Today 2 october 2024 : मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केल्यानंतर पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. मागील आठवडाभरापासून देशातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

Satish Daud

मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केल्यानंतर पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. मागील आठवडाभरापासून देशातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. नेपाळमध्ये झालेल्या पावसामुळे बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका 16 जिल्ह्यांतील 12 लाखांहून अधिक लोकांना बसला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली असून तापमानात वाढ होत आहे.

अशातच महाराष्ट्रासह ९ राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, नगर, रायगड, धुळे, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.

इतर भागात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची उघडीप राहील, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. दुसरीकडे आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मान्सूनने २३ सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरु केल्यानंतर राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली होती. परंतु त्यानंतर २४ सप्टेंबरपासून मात्र आपला मुक्काम कायम ठेवला. मंगळवारी (ता. १) देखील मान्सूनचा प्रवास थबकला होता.

दरम्यान, मध्य प्रदेश आणि दक्षिण गुजरातमधील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. त्यामुळे हवेत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. हा पट्टा उत्तर कोकणापासून आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसात महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस होईल, असंही आयएमडीने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT