Rahul Gandhi Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi PC : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Political News : राहुल गांधी यांनी या निर्णयानंतर नंतर बोलताना, सर्वांचे आभार मानले. सत्याचा विजय होतोच.

साम टिव्ही ब्युरो

Rahul Gandhi PC : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'मोदी आडनाव' यावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी सूरतच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा सूरत न्यायालयाच्या निकालाला आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राहुल गांधी यांनी या निर्णयानंतर नंतर बोलताना, सर्वांचे आभार मानले. सत्याचा विजय होतोच.

 राहुल गांधी म्हणाले, आज नाही तर उद्या सत्याचा विजय होईल. मला माझे ध्येय माहित आहे. देशासाठी जे करायचं ते करणारच आहे. आम्हाला मदत करणाऱ्या सर्वांचे आणि जनतेने दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याचे आभार मानतो.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, ज्यावेळी सूरत न्यायालयाचा निकाल आला त्यावेळी वेगाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. आता खासदारकी किती वेळाता पुन्हा बहाल केली जाते हे पाहुया. (Latest News)

आजचा विजय केवळ राहुल गांधी यांचा नाही. एक व्यक्ती जो सत्यासाठी लढत आहे. देशाच्या हितासाठी लढत आहे. महागाई, बेरोजगारी, भारत जोडो यात्रेत मिळालेल्या सर्व नागरिकांच्या पाठिंब्याचा हा विजय आहे, असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT