भारत आणि अमेरिका यांच्यात बहुप्रतीक्षित व्यापार कराराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाहीये. अशातच आता लैंगिक शोषणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या भेटीचा फोटो समोर आलाय. आणि त्यात योगायोग म्हणजे, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो हे जामनगर आणि मुंबई दौऱ्यावर आलेत. त्यामुळे एपस्टीन फाईल्सच्या माध्यमातून अमेरिकेकडून भारतावर दबाव टाकला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. विशेष म्हणजे, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या मुंबई भेटीचा आणि या फोटोच्या टायमिंगचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोठं विधान केलंय. राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात...
राहुल गांधींचे ट्विट
''रुबिओ मुंबईत पोहोचले. US डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने एपस्टीन आणि पुरी यांचा फोटो शेअर केला. प्रिय, भाजप आणि RSS कार्यकर्त्यांनो, तुम्हाला काय वाटतं?... हे कोणत्या देशविरोधी गद्दारांना ब्लॅकमेल करत आहेत?
तर दुसरीकडे, ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी हरदीप पुरींच्या एपस्टिनसोबतचा फोटो शेअर थेट रिजिम चेंजचे संकेत दिले होते. त्यानंतर आता एप्स्टीन फाईलवरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय... भारत-अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं परराष्ट्रमंत्री मार्को रुबियोंचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. मात्र, वर्षभरापासून दोन्ही देशांतील व्यापार कराराचं घोंगडं अद्याप का भिजतंय, असा प्रश्न उपस्थित झालाय..
मात्र, दोन्ही देशांमध्ये व्यापार करार करण्यासाठी अमेरिकेचे प्रतिनिधी भारतात आल्यानंतरच एपस्टीन आणि पुरी यांचा फोटो समोर आलाय. आणि याच टायमिंगमुळेच अमेरिका एपस्टीन फाईल्स प्रकरणावरून भारताला ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप विरोधक करू लागलेत. त्यामुळे भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटीत एपस्टीन फाईल्सचा मुद्दा कळीचा ठरतोय का, अशी चर्चा आता देशभरात रंगलीये...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.