Rahul Gandhi  saam tv
देश विदेश

देशाचे नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींवर राहुल गांधींचे गंभीर आरोप; प्रियांकांच्या वक्तव्यावरही गदारोळ, नेमकं कारण काय?

rahul gandhi targets education minister prahlad joshi : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेले प्रल्हाद जोशी राहुल गांधींच्या निशाण्यावर आले. बलात्काऱ्यांचा बचाव करणारा शिक्षण मंत्री असल्याचा गंभीर आरोप गांधी यांनी केला.

Nandkumar Joshi

देशाचे नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर, तर खासदार प्रियांका गांधी यांनी संसदेच्या सभागृहात घेरलं. राहुल गांधी यांनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रल्हाद जोशींवर गंभीर आरोप केले. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शैक्षणिक सुधारणांबाबत तरुणांनी आंदोलन केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बलात्काऱ्यांचा बचाव करणाऱ्या व्यक्तीला देशाचे नवे शिक्षण मंत्री केले, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या काही तास आधीच खासदार प्रियांका गांधी यांनी प्रल्हाद जोशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. प्रियांका गांधी यांनी बिलकीस बानो प्रकरणात दोषींना जामीन मिळाल्याच्या संदर्भात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध बातमीचा हवाला देतानाच, लोकसभेत जोशींशी संबंधित टिप्पणी केली होती. ती कार्यवाहीतून हटवण्यात आली.

प्रियांका गांधींच्या वक्तव्यानंतर मंगळवारी लोकसभेत गदारोळ झाला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध दर्शवला. तर प्रियांका गांधी यांचे वक्तव्य संसदेच्या कार्यवाहीतून हटवण्यात यावे, तसेच प्रियांका यांनी माफी मागावी, अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली.

दुसरीकडे, संसदेच्या आवारात विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही प्रल्हाद जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले. देशात शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवरून तरुणांनी केलेल्या आंदोलनानंतर भाजपने भारताचे नवे शिक्षण मंत्री म्हणून अशा व्यक्तीची निवड केली, जी बलात्काऱ्यांचे संरक्षण करते. यापेक्षा लज्जास्पद बाब होऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. मंत्रिमंडळात इतके जण आहेत, कुणालाही ते शिक्षण मंत्री करू शकत होते. पण त्यांनी बलात्काऱ्यांचा बचाव करणाऱ्यांना शिक्षण मंत्री म्हणून निवडले. हे विचित्र आहे, असे राहुल म्हणाले.

सत्ताधारी सदस्य आक्रमक

प्रियांका गांधी यांनी लोकसभेत या मुद्द्याचा उल्लेख केला त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप नोंदवला. शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात निराधार आणि आक्षेपार्ह टिप्पणी असल्याचे ते म्हणाले. सभागृहात या वक्तव्यावरून काही वेळ गदारोळही झाला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप नोंदवत नव्या शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात अशा प्रकारची टिप्पणी करणे योग्य नाही. जर प्रियांका गांधी आरोप सिद्ध करू शकल्या नाहीत तर, त्यांनी सभागृहात माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT