Rahul Gandhi detained during INDIA Bloc protest at Jantar Mantar 
देश विदेश

राहुल गांधींना खांद्यावर उचलून नेत गाडीत कोंबलं; प्रियंका गांधींचा रस्त्यावर ठिय्या, जंतर-मंतरवर हाय होल्टेज ड्रामा

INDIA Bloc Protest in Delhi : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या आंदोलनाला जंतर-मंतरवर नाट्यमय वळण मिळालं. खासदारांना रोखल्यानंतर राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं, तर प्रियंका गांधी यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं.

Bharat Jadhav

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेक कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडी आक्रमक झालीयय. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षनेते खासदर राहुल गांधी आपल्या इतर खासदारासोबत जंतरमंतरकडे कूच केली. जंतरमंतरकडे जात असताना पोलिसांनी खासदारांना रोखलं. त्यांच्या बसेस अडवल्या. त्याच्या निषेधार्थ प्रियंका गांधी रस्त्यावर ठिय्या मांडला. पोलिसांनी खासदारांना मारहाण केल्यानं प्रियंका गांधी आक्रमक झाल्या असून त्या रस्त्यावर झोपून आंदोलन करू लागल्या. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधींना खांद्यावर उचलून गाडीत कोंबलं.यामुळे जंतरमंतर परिसरात मोठा गदारोळ माजलाय.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलेल्या आवाहनानुसार, 'इंडिया' (INDIA) आघाडीचे खासदार दिल्लीतील जनपथ येथील 'सागर रत्न' रेस्टॉरंटमध्ये जमले होते. हे रेस्टॉरंट जंतरमंतरपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असल्याने त्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसेच तिथे सध्या बीएनएसएस (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू आहेत.

पोलिसांनी खासदारांना मारहाण केली, प्रियंका गांधींचा गंभीर

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कालपासून सुरू झालेल्या या आंदोलनाने आज रौद्ररुप धारण केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. अचानक शेकडोच्या संख्येने एकत्र आलेल्या विरोधकांनी जंतरमंतरच्या दिशेने कूच केले. आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.

रस्त्यावर ठिय्या मांडल्यानंतर प्रियंका गांधी यांनी पोलिसांच्या वर्तनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या पोलिसांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि खासदारांना चुकीच्या पद्धतीने हटवले व मारहाण केली. पोलीस प्रशासनाने महिला व वरिष्ठ खासदारांशी अत्यंत गैरव्यवहार केला असा आरोप प्रियंका गांधींनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरच्या मिरी येथे उपबाजारासाठी ४ हेक्टर जमीन, महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय

T20 Ranking : वाह सरपंच साहेब! टी २० रँकिंगमध्ये श्रेयस अय्यरचा धमाका, टॉप टेनमध्ये किती भारतीय फलंदाज?

Political News: ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर इंडिया आघाडीत फूट? अवघ्या काही तासांत मोठ्या घडामोडी

Fort : किल्ल्यात बांधला पाणी महाल; शाही वास्तुकला पाहून थक्क व्हाल, लोकेशन नोट करा

Cold Or Hot Water : थंड की गरम, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे?

SCROLL FOR NEXT