Rahul Gandhi climbs barricade during Delhi protest 
देश विदेश

दिल्लीतील वातावरण तापले! राहुल गांधींचा गनिमी कावा, आयोगात जाण्यासाठी लढवली शक्कल, थेट आकाशवानी भवनात पोहोचले अन्...

Rahul Gandhi climbs barricade during Delhi protest : मतदार यादीतील फेरफाराच्या आरोपांवरून इंडिया आघाडीने दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला. राहुल गांधी बॅरिकेड्सवर चढले, तर राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अनेक खासदारांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला.

Namdeo Kumbhar

Rahul Gandhi Protest : मतदार यादीत करण्यात आलेल्या फेरफाराचा आरोप करत 'इंडिया' (INDIA) आघाडीने आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडला. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच केली. या आंदोलनामुळे मध्य दिल्लीतील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधी बॅरिकेड्सवर चढले, प्रियंका गांधी रस्त्यावर ठाण मांडून

आंदोलनादरम्यान एक थरारक दृश्य पाहायला मिळाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हातात तिरंगा घेऊन थेट पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढले. पोलिसांनी रस्ता अडवल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले.

काही वेळातच पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह 'इंडिया' आघाडीच्या अनेक खासदारांना ताब्यात घेतले. राहुल गांधींना घेऊन जाणारी पोलिसांची बस कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे काही काळ रस्त्यातच अडकून पडली होती.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यासाठी गनिमी कावा केला. राहुल गांधी आणि काही खासदार जवळच असलेल्या आकाशवानी भवनात अचानक गेले. त्या ठिकाणाहून राहुल गांधी यांनी आयोगाच्या कार्यलयात शिरण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. दिल्लीतील राजकाऱण तापले आहे. राहुल गांधींसह विरोधीपक्षातील अनेक खासदारांनी आज मोर्चा काढलाय.

बीजू जनता दल (BJD) ची अनपेक्षित साथ

या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत तटस्थ भूमिका घेणारा नवीन पटनायक यांचा 'बीजू जनता दल' (BJD) पक्षही या विरोधात सामील झाला. बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनी आधीच 'एसआयआर' (SIR) प्रकरणाला कडाडून विरोध केला होता. आज त्यांच्या पक्षाच्या खासदारांनीही या मोर्चात सहभाग घेतला.

नीती आयोगाच्या दफ्तरासमोर पोलिसांची नाकेबंदी

विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असताना, नीती आयोगाच्या इमारतीसमोर सुरक्षा दलांनी त्यांना रोखले. यावेळी खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हा लढा चालूच राहील, असा इशारा विरोधकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News : पोटनिवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा! मतदानानंतर उमेदवाराला केली अटक; नेमकं काय घडलं?

Health Tips : उशिरा उठता आणि व्यायामही करत नाही? शरीरात होऊ शकतात 'हे' गंभीर बदल, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Maharashtra News Live Update: प्रियंका गांधी आणि राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

PM Kisan Yojana : एकाच घरातून २-२ जणांनी घेतले योजनेचे पैसे! सन्मान निधीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, 'या' लोकांची यादी तयार

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार १० ऑक्टोबरच्या आधी राजीनामा देतील, बड्या राजकीय नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT