Rahul Gandhi News Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi : भाजपकडून युवा भारतीयांचे अंगठे कापण्याचे काम; राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Rahul Gandhi on Constitution: संविधान हे आमचं प्रतिक आहे, आमचा आवाज आहे. संविधान संस्कृतीचे प्रतिक आहे, असं संसदेत संविधानावर विशेष चर्चासत्रात राहुल गांधींनी म्हटलं.

Bhagyashree Kamble

Parliament Winter Session News : एकलव्य यांचा दाखला देत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. जसं द्रोणाचार्य यांनी एकलव्य यांचा आंगठा मागितला होता, तसेच भाजप गरिबांचा आणि देशातील तरुणांचा अंगठा कापत आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. सावरकर हे संविधानाच्या विरोधात बोलले असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'संविधान हे आमचं प्रतिक आहे, आमचा आवाज आहे. संविधान प्राचीन संस्कृतीचे प्रतिक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.' ते संसदेत संविधानावर विशेष चर्चासत्रात बोलत होते.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाचा मुद्दा पुन्हा लावून धरला. संविधान हे आमचं प्रतिक आहे, आमचा आवाज आहे. संविधान प्राचीन संस्कृतीचे प्रतिक आहे, असं संसदेत संविधानावर विशेष चर्चा सत्रात त्यांनी म्हटलं. तसेच सरकार अदानी, अंबानी यांना मदत करून तरूणांचा अंगठा कापत असल्याचं यावेळी राहुल गांधींनी म्हटलेय.

लोकसभेतील हिवाळा अधिवेशनात त्यांनी भाजपावर टीका करताना एकलव्याची कहाणी सांगितली. 'जसे द्रोणाचार्यांनी एकलव्याचे अंगठा कापला. त्याचप्रमाणे भाजप तरूणांचे अंगठे कापत आहेत.' असं राहुल गांधी म्हणाले. तसेच, भाजप धारावी अडानी यांना देत आहेत. तर तुम्ही छोटे व्यापाऱ्यांचे अंगठे कापत आहात. असं म्हणत धारावीच्या मुद्यावर भाजपवर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT