Rahul Gandhi Latest Update / Congress/ @INCIndia Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi : काँग्रेस अध्यक्ष होणार?; राहुल गांधी आपल्या म्हणण्यावर ठाम, म्हणाले...

काँग्रेस अध्यक्षपद ऐतिहासिक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Nandkumar Joshi

Rahul Gandhi On Congress President | तिरुवअनंतपुरम: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाचे अध्यक्ष व्हावं, असा ठराव महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमधील प्रदेश काँग्रेसनं मंजूर केला असला तरी, त्यांनी स्वतः काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचं पुन्हा स्पष्ट केलं. केरळमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राहुल यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या निर्णयावर ठाम असल्याचं राहुल म्हणाले.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) पराभव झाल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी काँग्रेसचा अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरील होईल, असे ते म्हणाले होते. मात्र, राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.

गेल्या जवळपास तीन वर्षांत काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले होते. अलीकडेच काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Congress President Elections) घोषणा झाली. त्यानंतर पुन्हा ही मागणी जोर धरू लागली. महाराष्ट्रासह दहा राज्यांमधील काँग्रेस प्रदेशने राहुल गांधींच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केले आहेत. त्यानंतरही राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष होण्यास नकार दिला आहे.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर पुन्हा नकार दिला आहे. मी माझ्या आधीच्या निर्णयावर ठाम आहे. मी त्याचा पुनरुच्चारही केला आहे. अध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या संभाव्य नेत्याला काय सल्ला द्याल, असा प्रश्न विचारला असता, काँग्रेसचं अध्यक्षपद हे ऐतिहासिक आहे. तुम्ही या ऐतिहासिक पदावर विराजमान होणार आहात. ते एक वैचारिक पद आहे. तुम्ही एका विचारधारेच्या समूहाचं प्रतिनिधीत्व करता. जे कुणी काँग्रेसचे अध्यक्ष होतील, त्यांनी काँग्रेसच्या या विश्वास प्रणाली आणि विचारधारेचे प्रतिनिधीत्व करावे, असे राहुल गांधी म्हणाले.

एक व्यक्ती, एक पद याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर जो उदयपूरमध्ये निर्णय झाला होता, मला वाटतं की त्याचं प्रत्येक जण पालन करेल, असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसचा अध्यक्ष कोण होईल हे तुम्ही पक्षाला विचारत का नाहीत? काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होते, इतर पक्षांमध्ये होत नाही. इथे कुणीही निवडणूक लढवू शकतं. तु्म्ही केवळ मलाच प्रश्न विचारता? तुम्ही हा प्रश्न भाजप, सपा, बसपा आणि डाव्या पक्षांना का विचारत नाहीत, असा प्रतिप्रश्न राहुल गांधी यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT