Rahul Gandhi Air India flight go-around at Lucknow airport saam tv
देश विदेश

Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान लँड न होता पुन्हा हवेत झेपावलं; लखनौ एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi’s Flight : दिल्लीहून लखनौला येणाऱ्या Air India AI-1717 विमानाने लँडिंगच्या आधी गो-अराउंड केलं. त्यानंतर विमान पुन्हा उंचीवर जाऊन दुसऱ्या एप्रोचसाठी आलं आणि सुरक्षितपणे लँड झालं. या विमानात राहुल गांधी असल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

  • Air India AI-1717 विमानाला लखनौ विमानतळावर पहिल्या लँडिंग प्रयत्नात गो-अराउंड करावा लागला

  • पहिला एप्रोच अस्थिर झाल्याने पायलटने सुरक्षेला प्राधान्य देत लँडिंग रद्द केल्याचं प्राथमिक वृत्त

  • विमान पुन्हा उंचीवर नेऊन दुसऱ्या एप्रोचनंतर सुरक्षितपणे लँड करण्यात आलं.

दिल्लीहून येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-1717 या विमानाला लखनौच्या अमौसी विमानतळावर उतरण्यापूर्वी 'गो-अराउंड' (विमान न उतरवता पुन्हा आकाशात झेपावणे) करावे लागले. या विमानात काँग्रेस नेते राहुल गांधी असल्याचे समजते. लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नादरम्यान विमानाची स्थिती अस्थिर असल्याने, वैमानिकाने सुरक्षिततेला प्राधान्य देत लँडिंग रद्द केले; त्यानंतर विमान पुन्हा अधिक उंचीवर नेऊन लँडिंगच्या नवीन प्रयत्नासाठी त्याची पुन्हा जुळवाजुळव केली.

उत्तर प्रदेशातील लखनौमधून मोठी बातमी समोर आलीय. अमौसी विमानतळावर दिल्लीहून येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-1717 या विमानाला लँडिंग करण्यास अडचण निर्माण झाली. या विमानात विरोधी पक्षनेते राहुल गांधी होते. राहुल गांधींचे विमान लखनौ विमानतळावर लँड होण्याऐवजी पुन्हा हवेत झेपावलं. विमानतळावर नेमकं काय घडलं, पायलटला ‘गो-अराउंड’ का करावे लागले. हे जाणून घेऊ.

दिल्लीहून दुपारी दोन वाजता निघालं होतं विमान

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान AI-1717 दुपारी २:२० च्या सुमारास दिल्लीहून निघाले होते. हे विमान लखनौला दुपारी ३:३० च्या आसपास पोहोचणार होतं. परंतु लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नादरम्यान विमानाचा 'अप्रोच' (उतरण्याची प्रक्रिया) अस्थिर असल्याने, वैमानिकाला 'गो-अराउंड' (विमान पुन्हा हवेत वर नेणे) करावे लागले, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले.

हाती आलेल्या माहितीनुसार, ही घटना पायलटनं पाळलेल्या सुरक्षा कार्यशी संबंधित होती. लँडिंगसाठीचा अप्रोचवेळी विमान अस्थिर झाल्यानं 'गो-अराउंड' करण्यात आले. म्हणजेच विमान पुन्हा उंच हवेत नेत पुन्हा लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान राहुल गांधीही याच विमानाने दिल्लीहून लखनौला आले होते. लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरल्याने परिस्थिती सामान्य झाली.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाची घटना

७ सप्टेंबर रोजीही एअर इंडिया एक्सप्रेसचे विमानात असाच बिघाड झाला होता. एअर इंडिया एक्स्प्रेसचे IX415 (बोईंग ७३७) विमान कोचीहून अबुधाबीच्या दिशेने जात होते. सुमारे ३६,००० फूट उंचीवर असताना, इंजिन क्र. १ मधील तेलाची पातळी वेगाने कमी झाल्याची बाब पायलटला समजली. त्यानंतर वैमानिकांनी ते इंजिन बंद करून विमान परत कोचीला नेण्याचा निर्णय घेतला. विमान सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना दुसऱ्या विमानाद्वारे अबुधाबीला रवाना करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT