Rahul Gandhi Latest News SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi Latest Tweet: सूरत कोर्टानं दिलासा दिल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मित्रकालविरुद्ध लोकशाही...'

Rahul Gandhi Latest News: मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Nandkumar Joshi

Rahul Gandhi Latest News: मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांनी मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेच्या निर्णयाविरोधात कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. सेशन कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही वाचवण्यासाठीचा हा संघर्ष असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी ट्विट केलं आहे. 'मित्रकाल'च्या विरोधात माझा लोकशाही वाचवण्यासाठी लढा सुरू आहे. या संघर्षात सत्य हाच माझा अस्त्र आहे आणि सत्य हेच आधार आहे, असे ते ट्विटमध्ये म्हणाले. (Latest Marathi News)

सेशन कोर्टाने (Session Court) राहुल गांधी यांना १३ एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे. याच दरम्यान राहुल गांधींना स्वतः कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नाही.

निकालानंतर ११ दिवसांनी राहुल गांधी सेशन कोर्टात

तत्पूर्वी, स्थानिक कोर्टानं राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर लगेच त्यांना सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले होते.

या निकालाच्या ११ दिवसांनंतर म्हणजेच ३ एप्रिलला राहुल गांधी यांनी स्थानिक कोर्टाच्या निकालाला सेशन कोर्टात आव्हान दिले. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेसाठी ३० दिवसांचा कालावधी दिला होता. आता राहुल गांधी यांना सेशन कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT