Rahul Gandhi girlfriend Cambridge University story saam tv
देश विदेश

गर्लफ्रेंडबद्दल काय बोलले राहुल गांधी? राहुल गांधींची गर्लफ्रेंड सध्या काय करते?

Rahul Gandhi Love Story: सध्य़ा देशात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती राहुल गांधींच्या गर्लफ्रेंडची...सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधींनी आपल्या गर्लफ्रेंडबाबत काय गौप्यस्फोट केला? त्यांची गर्लफ्रेंड आता नेमकं काय करते? पाहूयात हा रिपोर्ट..........

Snehil Shivaji

सध्या देशभरात चर्चा आहे ती सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह या आत्मचरित्राची...याच पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पुस्तकाच्या पानांमागे दडलेल्या प्रेमाच्या गोष्टींसोबतच एका वेगळ्याच प्रेमकहाणीची चर्चा रंगलीये! आणि ती म्हणजे राहुल गांधींच्या गर्लफ्रेंडची...सोनिया गांधींनी आपल्या आत्मचरित्र्यात राजीव गांधींसोबतची रेस्टॉरंट मधली पहिली भेट आणि बहरलेल्या प्रेमावर सविस्तर लिहीलंय. आणि मग केंब्रिजमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या राहुल गांधींनी तिथं गेल्यावर काय केलं ते ऐका..

राहुल गांधी हे शिक्षणासाठी केंब्रिजमध्ये होते तेव्हा त्यांनी जिथे त्यांचे वडील आणि आई सोनिया गांधी यांची पहिली भेट झाली त्या वर्सिटी रेस्टॉरंटमध्ये आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन गेले. तिथल्या कर्मचाऱ्याला राहुल गांधींनी माझे आई-वडील याच रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदा भेटल्याच सांगितलं होतं पण या रेस्टॉरंटमधलं जेवण जे माझ्या आई वडिलांना आवडलं ते मात्र मला आवडलं नाही अशी गंमतही यावेळी सांगितली. पण राहुल गांधींनी आठवणीत जागवलेली ती गर्लफ्रेंड कोण या प्रश्नावर राहुल गांधी थोडे लाजले इकडे तिकडे पाहिलं आणि मग काय म्हणले तेही ऐका,

५६ वर्षांच्या राहुल गांधींना आता लग्न करावं अशी गळ लालूनीं इंडिया आघाडीच्या बैठकीत घातली होती. त्यामुळे जसं सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न राष्ट्रीय प्रश्न झालाय. .तसाच राहुल गांधी लग्न कधी करणार असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. आता राहुल गांधींनीच आपल्या प्रेयसीबद्दल जगाला माहिती दिल्यामुळे देशाच्या राजकारणात मुरलेल्या या नेत्याच्या आयुष्याची एक रोमँटिक बाजू समोर आलीये, त्यांचं हे प्रेम आणि ती खास मैत्रीण सध्या कुठे असेल? काय करत असेल? हे जाणून घेण्याची उत्सुकता आता संपूर्ण देशवासीयांना लागलीये!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात ऊस दरवाढीचं आंदोलन पेटलं, कोल्हापूर पॅटर्न राबवण्याची शेतकऱ्यांची मागणी

अदानींना मोठा धक्का; प्रकल्पाचं काम बंद ठेवण्याचे वनविभागाचे आदेश

Maharashtra News Live Update: सूरत–नवसारीदरम्यान वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना

मुंबईतील उड्डाणे नवी मुंबईला नेण्यावरून अदानी एअरपोर्ट आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद?

जन्मदाताच बनला मुलांचा वैरी! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांना कालव्यात फेकले; छत्रपती संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT