Rahul Gandhi Latest News In Marathi SAAM TV
देश विदेश

New Parliament Inauguration Row : अहंकाराच्या विटांनी... संसद भवन उद्घाटन वादात राहुल गांधी यांचीही उडी

Rahul Gandhi On New Parliament Inauguration Row : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू झालेल्या वादानं आता टोक गाठलं आहे.

Nandkumar Joshi

Rahul Gandhi On New Parliament Inauguration Row : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू झालेल्या वादानं आता टोक गाठलं आहे. त्यात आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

नवीन संसद भवनाच्या (Parliament) उद्घाटनाचा वाद टोकाला गेला आहे. या वास्तूचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते २८ मे रोजी होणार आहे.

काँग्रेससह १९ विरोधी राजकीय पक्षांनी (Political Parties) या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या घडामोडी सुरू असतानाच राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन न करणे हा देशाचा अवमान आहे, असे ते म्हणाले.

'राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन न करणे आणि त्यांना सोहळ्याला निमंत्रित न करणे हा देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदाचा अवमान आहे. संसद अहंकाराच्या विटांनी नाही, तर संवैधानिक मूल्यांनी उभारली जाते,' असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नव्या संसद भवनात 'सेंगोल'

नव्या संसद भवन उद्घाटनाचा वाद सुरू असतानाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. आम्ही उद्घाटन सोहळ्याला सर्वांना निमंत्रित केले आहे. तुम्ही याचा संबंध राजकारणाशी जोडू नका. जुन्या परंपरांशी नव्या भारताला जोडण्याची भावनात्मक प्रक्रिया आहे. तसेच ऐतिहासिक सेंगोल नव्या संसद भवनात ठेवण्यात येणार आहे, अशीही माहिती अमित शहा यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT