Rahul Gandhi Convoy Accident on Purvanchal Expressway: उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या ताफ्याचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात राहुल गांधी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. (Five Cars and an Ambulance Involved in Rahul Gandhi Convoy Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस-वेवरून ताफा जात असताना अचानक गाड्या एकमेकांवर आदळल्या. या दुर्घटनेत ताफ्यातील ५ गाड्या आणि एका रुग्णवाहिकेची (Ambulance) आपसात जोरदार धडक झाली.
ताफा वेगात असताना गाड्या एकमेकांवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गाड्या एकमेकांवर धडकल्याने वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघातानंतर ताफ्यातील सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती हाताळली.
राहुल गांधी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. घटनेनंतर सुरक्षेची पाहणी करून राहुल गांधी यांचा ताफा पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आला आहे. पोलीस या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.