Rahul Gandhi raises a cryptic ‘16’ question in Lok Sabha, triggering nationwide political speculation. saam tv
देश विदेश

राहुल गांधींनी लोकसभेत घातलं '16' नंबरचं कोडं,'सिस्क्टीन' ते 'एपस्टीन'चं नेमकं कोडं काय?देशात राजकीय भूकंप होणार?

From Sixteen To Epstein Rahul Gandhi Hint Raises Big Questions: राहुल गांधीनी लोकसभेत सत्ताधाऱ्यांना घातलेलं एक कोडं आता चांगलचं चर्चेत आलयं...16 नंबरच्या या कोड्यावरून राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा रंगलीय... आणि या कोड्याचं नेमकं उत्तर काय आहे?

Suprim Maskar

दिल्लीच्या राजकारणात सध्या एकाच आकड्याची जोरदार चर्चा सुरु आहे...तो आकडा म्हणजे 16...संसदेत महिला आरक्षणावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असतानाच विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक कोडं घातलं...ज्यानं सत्ताधारी बाकांवर अस्वस्थता आणि समाजमाध्यमांवर तर्कवितर्काचं वादळ उठलयं...राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ऐका...

दरम्यान राहुल गांधींनी लोकसभेत घातलेल्या या 16 नंबरच्या कोड्यावरून वेगवेगळे कयास सोशल मीडियावर बांधले जातायत... या कोड्याची उत्तरं काय असू शकतात

1. महिला आरक्षण आणि 'टायमिंग'

केंद्र सरकारने 'महिला आरक्षण कायदा २०२३' ची अधिसूचना १६ एप्रिल २०२६ रोजीच जारी केली. हा केवळ योगायोग की राजकीय खेळी?"अशा चर्चा सुरु

२. 'एपस्टीन' कनेक्शन

काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून "Sixteen sounds like Epstein" अशी पोस्ट करण्यात आली. जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित काही आंतरराष्ट्रीय खुलासे तर यामागे नाहीत ना? अशी चर्चा आहे.

३. TDP चे १६ खासदार आणि सत्तेची चावी

तेलगू देसम पार्टीचे १६ खासदार सध्याच्या सरकारला पाठिंबा देत आहेत. या १६ खासदारांच्या भूमिकेवर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे का? अशाही चर्चा

४. 16 पानांचा दस्ताऐवज/16 मिनिटांचा व्हिडिओ

काही लोक असा अंदाज लावत आहेत की १६ मिनिटांचा एखादा व्हिडिओ किंवा १६ पानांचा असा काही दस्तऐवज समोर येणार आहे ज्यामुळे राजकीय भूकंप होईल किंवा मोठा नेता एक्सपोज होईल

५. पडद्याआड घडलेल्या घटना, पंतप्रधनांचा थकवा

राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या 'कमी ऊर्जे'चा उल्लेख केला. कदाचित 16 तारखेला अशा काही घडामोडी पडद्यामागे घडल्या ज्यामुळे पंतप्रधान मोदी मानसिक दबावात होते.

त्यात 16 नंबरच्या कोड्यावरून खासदार राऊतांनी X वर पोस्ट करत... 16 आकडा एपस्टीन फाईल्सशी आणि Adani SEC US फ्रॉड केसशी संबंधित असल्याचं सांगितलयं...त्यामुळे केंद्र सरकारसाठी 16 हा आकडा धोक्याचा आहे, अशी टीकाही राऊतांनी केलीय...

'गायब झालेल्या 16 एपस्टीन फाईलमध्ये काय?'

दुसरीकडे राहुल गांधींनी हे कोडं घालून चेंडू जनतेच्या कोर्टात टोलवला असला तरी संसदेबाहेर पत्रकारांनी विचारलं असता, " कोड्याचं उत्तर इतक्या सहजासहजी देणार नाही, उत्तर लवकरच समजेल," असं म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवलाय.

त्यामुळे एकीकडे संसदेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झालेलं असताना दुसरीकडे आता हा '16' नंबरचा आकडा खरोखरच एखाद्या राजकीय भूकंपाची पूर्वसूचना आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....मात्र या एका कोड्यानं संपूर्ण देशाला वेगवेगळे तर्कवितर्क करण्यास भाग पाडलयं आणि या कोड्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी देशातील जनताही आता उत्सुक आहे, येवढं मात्र नक्की...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने काँग्रेस विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निदर्शने...

PM Modi: महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना शिक्षा मिळणार, PM मोदींनी दिला थेट इशारा

नॉट रिचेबल सहर शेख दिसली वानखेडेवर, सहर शेख म्हणते 'गेम ओव्हर'

मी जाहीर माफी मागतो; PM नरेंद्र मोदी असे का म्हणाले? VIDEO

Child Marriage : बालविवाह रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल; कडक उपाययोजना आखल्या, सरपंच, पोलीस पाटलांनाही महत्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT