पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; स्फोटकांसह 3 दहशतवाद्यांना केलं गजाआड Saam Tv
देश विदेश

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; स्फोटकांसह 3 दहशतवाद्यांना केलं गजाआड

तीन दहशतवाद्यांना शस्त्र आणि स्फोटकांसह पंजाब पोलिसांनी तरणतारण जिल्ह्यातून अटक केली आहे.

वृत्तसंस्था

चंदीगड: तीन दहशतवाद्यांना शस्त्र आणि स्फोटकांसह पंजाब पोलिसांनी Punjab Police तरणतारण जिल्ह्यातून अटक केली आहे. माहिती आहे की, हे दहशतवादी एक मोठी घटना घडवण्याचा प्रयत्न करत होते अशी माहिती आहे. घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे तीन दहशतवादी पंजाबच्या मोगा Moga जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कुलविंदरसिंग, कमलप्रीत सिंग मान, कंवर पाल सिंह अशी या दहशतवाद्यांची तिघांची नावे आहेत.

हे देखील पहा-

एसएसपी उपिंदरजीत सिंग घुमान यांनी याबाबत माहिती दिली की, पोलीस स्टेशन भिखीविंदचे प्रभारी निरीक्षक नवदीप सिंग भट्टी हे रात्री त्यांच्या टीमसह Team गस्तीवर होते. भगवानपुरा Bhagwanpura गावाजवळ पोलिसांनी संशयावरून एक कार थांबवली. त्यात हे तिघे दहशतवादी होते. संशय आल्यामुळे कारची झडती घेतली. त्यात 9 एमएम पिस्तूल, 11 काडतुसे, एक विदेशी हातबॉम्ब आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान दहशतवाद्यांनी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचं उघड केलं आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेकडून दसऱ्याचा मुहूर्त

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

SCROLL FOR NEXT