Pressure Coocker Blast Saam Tv
देश विदेश

Pressure Coocker Blast CCTV : किचनमध्ये प्रेशर कुकरचा स्फोट; थरारक घटनेचा VIDEO आला समोर

Punjab Patiala News : पंजाबमधील पाटियालामध्ये एका घरात प्रेशर कुकरचा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pressure Cooker Exploades In Punjab:

पंजाबमधील पाटियालामध्ये एका घरात प्रेशर कुकरचा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओतील दृष्यांनुसार, स्वययंपाकघरात पाच-सहा जण उभे असल्याचे दिसत आहे. एका बाजूला गॅसवर कुकर दिसत आहे. सर्वजण आपापले काम करत आहेत. परंतु अचानक मोठा आवाज होतो अन् प्रेशर कुकरचा स्फोट होतो. घरातील सदस्यांना काही सेकंद नेमंक काय घडलं हेच समजत नाही. सर्वजण प्रेशर कुकरचा स्फोट झाल्यावर लांब पळतात.

प्रेशर कुकरच्या स्फोटानंतर कुकरचे झाकण छताला आदळताना दिसत आहे. त्यामुळे छताचा काही भाग आणि फर्निचर खाली पडतो. या स्फोटामुळे स्वयंपाकघरात सर्वत्र धूर पसरला.

प्रेशर कुकरच्या स्फोटामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या स्फोटात कोणालाही दुखापत झाली नाही. जेव्हा कुकरमध्ये वाफ तयार होते आणि शिट्टी होत नाही तेव्हा कुकरचा स्फोट होण्याची दाट शक्यता असते. याआधीही जयपूरमध्ये ऑगस्ट महिन्यात कुकरचा स्फोट झाल्याने एका ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT