संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे दोघंही लहानपणापासूनचे मित्र...एकमेकांच्या सुख दुःखाचे साक्षीदार... संतोष जगदाळे विमा कंपनीत कर्मचारी तर कौस्तुभ गणबोटेंचा फरसाणचा व्यवसाय... दोघांचीही अतुट मैत्री.
सहकुटुंब फिरायला जायचं म्हणून दोघांनी भारताच्या नंदनवनाची निवड केली... मनसोक्त फिरता यावं म्हणून दोघांनी मिळून सगळी आखणी केली...मात्र पहेलगामच्या बैसरण व्हॅलीत कुटुंबासमवेत फिरत असतानाची मंगळवारची दुपार या दोन मित्रांची अखेरची दुपार ठरली...आणि पुण्यात परतली ती त्यांची निर्जीव शरीर...
आपल्या डोळ्यांसमोर आपलं माणूस असं मारलं जाताना पाहण्याचं दुखः जगदाळे आणि गणबोटे कुटुंब कधीतरी विसरू शकेल का..
ही दोस्ती तुटायची नाही म्हणत एकमेकांना साथ देणाऱ्या या दोन मित्रांच्या मृत्यूने सगळेच हळहळलेत ..आपल्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरातही लोकप्रिय असणाऱ्या या दोन मित्रांचा मृत्यू चटका लावणारा आहे...कुणीतरी धर्माध दहशतवादी निरपराधांवर गोळ्या झाडतो आणि असहाय्य हतबल कुटुंब निव्वळ अश्रू ढाळत रहातं.. .या डोळ्यातील अश्रूचं मोल कसं भरून काढणार..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.