Nupur Sharma, Prophet Mohammad, Supreme Court, PIL Saam TV
देश विदेश

Prophet Remark Row : नुपूर शर्माच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

याचिकेनुसार, शर्मा यांच्या वक्तव्यामुळे देशात आणि जगभरात प्रचंड अशांतता आणि खळबळ माजली आहे आणि आपल्या महान राष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : भाजपच्या (bjp) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (nupur sharma) यांनी पैगंबर माेहम्मद (paigambar muhammad) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने देशभरात मुस्लिम बांधवांनी देशभरात जाेरदार निदर्शने केली. शर्मा यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान शर्मा यांच्या अटकेसाठी आता सर्वाेच्च न्यायालयात (supreme court) दाद मागण्यात आली आहे. (nupur sharma latest marathi news)

अबू सोहेल (Advocate Abu Sohel) आणि चांद कुरेशी (Advocate Chand Qureshi) या दाेन वकीलांच्या माध्यमातून शर्मा यांच्या अटकेच्या (arrest) मागणीची याचिका सर्वाेच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत शर्मा यांच्या विधानांमुळे घटनेच्या कलम 14, 15, 21, 26 आणि 29 आणि इतर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याबद्दल त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी अपेक्षा आणि मागणी करण्यात आली आहे.

शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद (Prophet Mohammad) आणि मुस्लिम समुदायाच्या विरोधात आक्षेर्पाह वक्तव्य केले आहे. त्यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. घटनेच्या 'स्वतंत्र, विश्वासार्ह आणि निःपक्षपाती तपासा'साची मागणी करीत शर्माला त्वरित अटक केली जावी असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

याचिकेनुसार, शर्मा यांच्या वक्तव्यामुळे देशात आणि जगभरात प्रचंड अशांतता आणि खळबळ माजली आहे आणि आपल्या महान राष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. शर्मा या भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांनी दूरचित्रवाणीवर त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करताना इस्लाम धर्माचा अपमान केला आणि 27 मे 2022 रोजी दूरचित्रवाणीवरील चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल असभ्य भाषेत वक्तव्य केले.

याचिकाकर्त्याने राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावरील 'असे चिथावणीखोर अपमानास्पद जातीय भाषण' म्हणजे जातीय द्वेषाचे बीज पेरणे आहे आणि शर्माच्या हेतूपूर्ण कारवाया संपूर्ण भारत देशात असंतोष निर्माण करत आहेत आणि सामाजिक समतोल बिघडवत आहेत असे म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामतीच्या तानाईनगरमध्ये गुलाबी मतदान केंद्राची निर्मिती

Suraj Chavan Dance Video: 'ये गो ये मैना' गाण्यावर सूरज चव्हाणचा बायकोसोबत डान्स, व्हिडीओ पाहून कौतुक कराल

Trump Controversy : भारत आणि चीन नरकासारखे; डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने नवा वाद

Viral Video : बाप रे! रिक्षाचं स्टेअरिंग अल्पवयीन मुलाच्या हातात, पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; Video व्हायरल

Raja Shivaji Cast Fees: रितेश देशमुख ते संजय दत्त; 'राजा शिवाजी' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT