CEO Death video Saam Tv
देश विदेश

CEO Death Video: हटके एन्ट्री जीवावर बेतली, लोखंडी पिंजऱ्यातून पडून कंपनीच्या CEOचा मृत्यू, VIDEO आला समोर

CEO Died In Accident: हैदराबादमध्ये खासगी कंपनीच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात लोखंडी पिंजऱ्यातून स्टेजवर एन्ट्री घेताना सीईओचा मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hyderabad News

हैदराबादमधील (Hyderabad) रामोजी फिल्म सिटीत एका खासगी कंपनीच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एका खासगी कंपनीच्या सीईओचा मृत्यू (CEO Death Video) झालाय, तर दुसरा अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. (Latest Marathi News)

अमेरिकेतील फर्मचे सीईओ आणि बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक संजय शाह यांचा लोखंडी पिंजरा कोसळून मृत्यू झाला आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये व्हिस्टेक्स एशिया-पॅसिफिकच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यादरम्यान ही घटना घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुरुवारी सायंकाळी ही घटना (Hyderabad) घडली आहे. व्हिडिओमध्ये कंपनीचे सीईओ संजय शाह आणि त्यांचे सहकारी राजू हे लोखंडी पिंजऱ्यातून स्टेजवर प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर पिंजऱ्याला आधार देणारी लोखंडी साखळी एका बाजूने तुटली, आणि त्या पिंजऱ्यात बसलेले सीईओ आणि त्यांचे सहकारी खाली कोसळले आहेत.

हा पिंजरा उंचावरून स्टेजवर खाली येताना दिसत (CEO Death Video) आहेत. तिथे अतिशय जल्लोषाचं वातावरण दिसत आहे. मोठ्या आवाजात गाणी वाजत आहेत, तेव्हाच ही घटना घडली आहे.

खाली पडल्यानंतर संजय शाह आणि त्यांच्या सहकाऱ्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान शहा यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या सहकाऱ्याची प्रकृती गंभीर होती. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलिसांनी (Hyderabad) दिलीय.

IPC कलम 304A अंतर्गत या (Hyderabad) इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. रामोजी फिल्म सिटी व्यवस्थापन, त्याचे वरिष्ठ इव्हेंट मॅनेजर, मुख्य व्यवस्थापक (सुरक्षा), स्पेशल इफेक्ट कॉन्ट्रॅक्टर आणि केज ऑपरेटर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात (CEO Death Video) आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT