Bus Accident Photo Saam TV
देश विदेश

Bus Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली खाजगी बस २५ फूट दरीत कोसळली; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा VIDEO समोर

Gujarat Bus Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस रेलिंग तोडून २५ फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत.

Satish Daud

Ahmedabad Pune Bus Accident

अहमदाबाद-बडोदा एक्सप्रेस वेवर शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस रेलिंग तोडून २५ फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस गुजरातच्या अहमदाबाद येथून पुण्याच्या दिशेने येत होती. या बसमधून जवळपास २३ प्रवासी प्रवास करीत होते. (Latest Marathi News)

शुक्रवारी रात्री बस अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवरवर आली असता, सिमेंटचा टँकर अचानक गाडी वळल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण (Bus Accident) सुटले. काही क्षणातच बस रेलिंग तोडून २५ फूट दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. उशिरापर्यंत मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

SCROLL FOR NEXT