पाकिस्तान: पाकिस्तान Pakistan सरकारने पंतप्रधान इम्रान खान Imran Khan यांचे इस्लामाबादचे Islamabad अधिकृत निवासस्थान भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात पाकिस्तानच्या फेडरल कॅबिनेटकडून आला. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयावरुन खिल्ली उडवली जात आहे.
परंतु देशाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान इम्रान खान 2019 पासून या निवासस्थानात राहत नाहीत. ते स्वतःचा घरी ‘बानी गाला आवास’ येथे राहतात. इम्रान खान यांनी 2019 मध्येच पंतप्रधान निवासस्थान विश्वविद्यालयात रुपांतरीत केले जाईल, अशी घोषणा केली होती.
हे देखील पहा-
इम्रान खान सरकारी म्हणता येईल अशा फक्त पंतप्रधान कार्यालयाचा वापर करत आहेत. त्यामुळे शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो अथवा अन्य कार्यक्रमांसाठी अधिकृत पंतप्रधान निवासस्थान भाड्याने Rent दिले जाणार आहे.
पूर्ण इमारतीऐवजी घेण्याऐवजी हवे त्यांना फक्त लॉन, गेस्टरूम सुद्धा भाड्याने मिळू शकणार आहे. यासाठी दोन स्वतंत्र कमिटीची नेमणूक केली आहे. अशी माहिती आहे की, पंतप्रधान निवासस्थानाची शिस्त व मर्यादा यांचे उल्लंघन होत नाही हे पाहण्याची जबाबदारी या कमिटीना सांभाळावी लागणार आहे.
विशेष म्हणजे 2019 मध्ये पंतप्रधानांचे निवास्थान ब्रिगेडियर वसीम इफ्तिखार यांच्या मुलीच्या लग्नासाठी भाड्याने दिले होते. या विवाहसोहळ्यासाठी पंतप्रधान इम्रान खानदेखील उपस्थित होते.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.