pm narendra modi convoy stopped in gujrat saam tv
देश विदेश

Video : PM मोदींचा ताफा थांबून अॅम्बूलन्सला वाट करून दिली; कौतुक तर होणारच

रुग्णवाहिका रस्यावरून पुढे गेल्यानंतर मोदींचा ताफा सुरु करण्यात आला, कारण...

नरेश शेंडे

गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या रस्त्यावरून एक रुग्णवाहिका जात असताना त्याच रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) ताफा जात होता. परंतु, रुग्णवाहिकेला प्रथम प्राधान्य देऊन मोदींचा ताफा थांबवण्यात आला. मोदींचा ताफा अहमदाबादवरून गांधीनगरला जात असताना रस्त्यातच थांबवण्यात आला. कारण, ताफ्याच्या मागच्या बाजूने रुग्णवाहिका येत होती. ही रुग्णवाहिका रस्यावरून पुढे गेल्यानंतर मोदींचा ताफा सुरु करण्यात आला. (PM Narendra Modi Convoy stops for ambulance emergency in gujrat)

गांधीनगरसाठी निघाला होता मोदींचा ताफा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले होते. दुसऱ्या दिवशी मोदींनी स्वदेशी वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन केलं. त्यानंतर अहमदाबादमध्ये गुजरातच्या पहिल्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.या कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर मोदींचा ताफा गांधीनगरसाठी निघाला होता.

रुग्णवाहिकेला रस्ता दिल्यानंतर निघाला मोदींचा ताफा

पंतप्रधान मोदींचा ताफा रस्त्यावरून जात असताना मागच्या दिशेनं रुग्णवाहिका येत होती. त्यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी मोदींचा ताफा थांबवण्यात आला. रुग्णवाहिका रस्त्यावरून पुढे गेल्यानंतर मोदींचा ताफा सुरु करण्यात आला. जेव्हा व्हीआयपी नेत्यांचा दौरा असतो किंवा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असतो, त्यावेळी स्कूल बस, रुग्णवाहिकेलाही थांबवण्यात येतं.

परंतु,मोदींचा ताफा अहमदाबाद-गांधीनगर रस्त्यावर रुग्णवाहिका येत असल्याने थांबवण्यात आला. रुग्णवाहिकेसाठी मोदींचा ताफा थांबवण्यात आला, या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. सोशल मीडियावरही मोदींच्या या निर्णयाबाबत स्तुतीसमुनं उधळली जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT