Adar Poonawalla Saam Tv
देश विदेश

कोविशिल्ड लसीची किंमत निम्म्यावर; केवळ इतक्या रुपयात मिळणार

खासगी रुगणालयात कोविशिल्ड लस २२५ रुपयांत मिळणार असल्याची घोषणा सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी शनिवारी केली.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: कोरोनावरील (Corona) बुस्टर डोस घेण्यासाठी आता ६०० रुपये मोजावे लागणार नाहीत. सीरम इंस्टीट्यूटने कोविशिल्ड (Covishield) लसीची किंमत निम्म्याहून कमी करण्यात आली आहे. या संदर्भात अदर पुनावाला यांनी आज घोषणा केली आहे. कोविशिल्ड लस आता खासगी रुग्णालयात ६०० रुपयांऐवजी २२५ रुपयांना मिळणार असल्याती घोषणा पुनावाला (Adar Poonawalla) यांनी आज शनिवारी केली आहे.

सरकारने १८ वर्षावरील सर्वांना बुस्टर डोस देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लस १८ वर्षावरील सर्वांना खासगी रुग्णालयात कोविशिल्ड लस घेता येणार आहे. या लसीकरणाच्या एक दिवस अगोदरच अदर पुनावाला यांनी कोविशिल्डचे दर कमी झाल्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून १८ वर्षावरील सर्वांना १० तारखेपासून लसीकरणाच्या सूचना दिली आहे. ज्यांचे वय १८ वर्षे आहे आणि ज्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाली आहेत, त्यांना आता बुस्टर डोस मिळणार आहे. पहिले दोन डोस ज्या लसीचे घेतले आहेत, तिच लस बुस्टर डोसमध्ये दिली जाणार आहे. जर एखाद्याने कोविशिल्ड (Covishield) चा पहिला आणि दुसरा डोस घेतला असेल, तर त्या व्यक्तीला बुस्टर डोस कोविशिल्ड ( Covashield) दिला जाईल.

कोविडचा बूस्टर डोस हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोफत दिला जात आहे. त्याचबरोबर देशात १२ मुलांना कोरोनाची लस देण्याचे कामही वेगाने सुरू आहे. देशात आतापर्यंत एकूण कोविड लसीकरण १८६ कोटींहून अधिक झाले आहे. देशात कोरोनाचा पहिला डोस (Vaccine) घेणाऱ्यांची संख्या १०० कोटींच्या जवळ पोहोचली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT