BANKIPUR BYPOLL RESULTS: PRASHANT KISHOR DEFEATS BJP IN ITS STRONGHOLD, SCORES BIG WIN 
देश विदेश

By Election Results: भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

Bihar Bankipur Bypoll Results: भारतीय जनता पक्षाने गुजरातच्या मंजलपूर जागेवरील आपले वर्चस्व कायम राखत मोठा विजय मिळवला आहे. मात्र बिहारमधील बांकीपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय.

Bharat Jadhav

बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झालाय. जन सूरज पार्टीचे (जेएसपी) संस्थापक प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षच्या बाल्लेकिल्ल्यात सुरूंग लावत मोठा विजय मिळवलाय. प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार नीरज कुमार यांचा १८,९५३ मतांच्या फरकाने पराभव केलाय. प्रशांत किशोर यांना ६३,२०३ मते मिळाली, तर नीरज कुमार यांनी ४४,२५० मते मिळवली. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) उमेदवार रेखा कुमारी १४,०८५ मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिल्या.

दरम्यान बांकीपूर हा भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. नवीन हे येथून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेत. ते राज्यसभेवर गेल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. मात्र याठिकाणी जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवलाय.

भाजपसाठी एक महत्त्वाचा संदेश

जरी या विजयाचा बिहार सरकार स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसला, तरी सत्ताधारी भाजप आणि जेडी(यू) यांना राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा एक स्पष्ट संदेश यातून गेलाय. निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरत असताना प्रशांत किशोर यांनी जनतेचा एक महत्त्वाचा संदेश दिलाय. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी गुजरातप्रमाणेच बिहारवरही तितकेच लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून या राज्यातील तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यांत स्थलांतर करावे लागणार नाही. जर गुजरातला 'हाय-स्पीड ट्रेन' मिळत असेल, तर बिहारला किमान एक प्रवासी गाडी तरी मिळायला हवी, असं प्रशांत किशोर म्हणाले होते.

बिहारचा मुख्यमंत्री बदला

मत मोजणीदरम्यान प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "मी आमदार झालो म्हणजे बांकीपूरचे रूपांतर रातोरात बेंगळुरूमध्ये होणार नाही, पण पुढील दोन-तीन महिन्यांत तुम्हाला येथे नक्कीच काही सुधारणा दिसून येतील. बांकीपूरच्या जनतेने भाजप नेतृत्वाला एक स्पष्ट संदेश दिला आहे. कृपया बिहारच्या मुख्यमंत्रीपदी एखाद्या चांगल्या व्यक्तीची नियुक्ती करा."

कोण आहेत प्रशांत किशोर?

मूळ बिहार येथील रहिवासी असलेले प्रशांत कुमार एक प्रसिद्ध रणनितीकार आहेत. त्यांनी आधी विविध पक्षांसाठी राजकीय रणनितीकार म्हणून काम केलंय. २०१५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत राजद-जद (यू)- काँग्रेसच्या महाआघाडीच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर २०१७ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, २०१९ मधील आंध्र विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेस पक्ष, २०२०मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, २०२१ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुकसाठी त्यांनी रणनितीकार म्हणून काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murud-Janjira Fort : गोड्या पाण्याची विहीर ते लपलेले प्रवेशद्वार, मुरुड-जंजिरा किल्ल्याची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहितेय का?

Eye Care : डोळ्यातून सतत घाण येते? दुर्लक्ष करू नका; 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

Ukala Benefits: पावसाळ्यात उकाळा प्यायला आवडतो? मग, जाणून घ्या शरीराला होणारे ७ जबरदस्त फायदे

Jantar-Mantar: जंतर-मंतर आंदोलनासाठी नाही, याचिकेवर सुनावणी होणार; सुप्रीम कोर्ट सुनावणार फैसला

SCROLL FOR NEXT