Pramod Sawant  SaamTvNews
देश विदेश

प्रमोद सावंत आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, PM मोदींसह दिग्गजांची उपस्थिती

प्रमोद सावंत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

वृत्तसंस्था

गोवा - प्रमोद सावंत (Pramod Sawant) सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नुकत्याच झालेल्या 40 सदस्यांच्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 11 तर आम आदमी पार्टीला 2 जागा मिळाल्या होत्या. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीला प्रत्येकी १-१ जागा मिळाल्या. याशिवाय एमजीपीचे २ आणि ३ अपक्ष आमदार विजयी झाले.

हे देखील पहा -

राजधानी पणजीतील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे, ज्यामध्ये 10,000 हून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, या सोहळ्याला पंतप्रधान मोदींशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध वृत्तवाहिन्यांवरूनही शपथविधी सोहळ्याचे प्रसारण होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

गोवा राज्य नक्कीच लहान आहे, पण राजकीयदृष्ट्या भाजप कोणत्याही राज्याला लहान मानत नाही आणि त्याचे महत्त्व ओळखतो. त्यामुळे छोट्या राज्यातही भाजपचे सर्व मोठे दिग्गज शपथविधी सोहळ्याला पोहोचणार आहेत. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याला काळा मास्क किंवा काळे कपडे घातलेल्या लोकांना समारंभात प्रवेश दिला जाणार नाही.

दरम्यान, आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह 9 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT