प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर संदीप नागरे
देश विदेश

प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

नवी दिल्ली - काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बाबत काँग्रेसने अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आले. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. यांच्या निधानाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसमधून अनेक जण स्पर्धेत होते. काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांचेही नाव विधान परिषदेच्या स्पर्धेत होते. मात्र, काँग्रेसने दिलेला शब्द पाळत रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमदेवारी जाहीर केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT