देश विदेश

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Uttar Pradesh: मथुरामधून समाजवादी पक्षाचे नेते डॉ. राजन रिझवी यांच्या नावाने कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशच्या मथुरामधून समोर आलेले एक धक्कादायक प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. समाजवादी पक्षाचे नेते डॉ. राजन रिझवी यांच्या व्हॉट्सॲप मेसेजचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सपा नेत्याने एका महिलेच्या सौंदर्याचे आणि व्यक्तिमत्त्वाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. राज्यात 'सपा'चे सरकार आल्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तिला थेट आयएएस अधिकारी बनवण्याचे आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. हे प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रीय लोक दल आणि इतर विरोधी पक्षांनी समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.

व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय?

डॉ. राजन रिझवी यांनी आपल्या मेसेजमध्ये महिलेला बोलताना आधी मागितली नंतर त्यांच्या कामाचं आणि सौदर्यांचं कौतुक करतात. पायल मॅडम नमस्ते, जर माझ्या शब्दांमुळे तुमचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो. तुम्ही एक खास आणि वेगळे व्यक्तिमत्त्व असलेल्या महिला आहात. तुम्ही सुंदर तर आहातच, शिवाय तुमचा स्वभावही चांगला आहे. तुम्ही कामातही निपुण आहात.

म्हणजेच तुम्ही एक परफेक्ट महिला आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सध्याची तुमची नोकरी शोभत नाहीये. भविष्यात जर मी राजकारणात पुढे गेलो आणि सपाचे सरकार आल्यास, तर मुख्यमंत्र्यांशी बोलून तुम्हाला डेप्युटेशनच्या आधारावर थेट आयएएस बनवण्याचा मी प्रयत्न करेन. आशा आहे की तुम्ही माझ्याबद्दल मनात सकारात्मक भावना ठेवाल आणि आशीर्वाद द्याल.

या प्रकरणावरून राष्ट्रीय लोक दलाचे ज्येष्ठ नेते रोहित अग्रवाल यांनी समाजवादी पक्षाच्या राजकीय संस्कृतीवर आणि कार्यपद्धतीवर सडकून टीका केलीय. अजून राज्यात सपाची सत्ता आलीही नाहीये, तेव्हा यांच्या नेत्यांचे हे हाल आहेत, जर चुकून यांची सत्ता आली तर हे लोक काय करतील?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT