PM Narendra modi  Saam tv
देश विदेश

मी जाहीर माफी मागतो; PM नरेंद्र मोदी असे का म्हणाले? VIDEO

PM Narendra modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक पडण्यावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर त्यांनी विधेयक पडल्यावरून महिलांची माफी मागितली.

Vishal Gangurde

विधेयक पडण्यावरून पंतप्रधान मोदींनी केलं जनतेला संबोधित

विधेयक पडण्याला विरोधी पक्ष नामंजूर असल्याची मोदींकडून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली सर्व महिलांची माफी

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी जनतेला संबोधित केलं. लोकसभेत विधेयक नामंजूर होण्यास विरोधी पक्ष जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. 'विरोधी पक्षांनी स्वत:च्या स्वार्थासाठी विधेयकाला मंजूर होऊ दिलं नाही. देशातील नारी शक्ती सर्व पाहत आहे. विधेयक पडल्याने मला दु:ख झालं. मी सर्व महिलांची जाहीर माफी मागतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, विरोधकांनी नारी शक्तीची भरारी रोखली. त्यांनी महिलांच्या स्वप्नांना चिरडून टाकलं. सरकारने पूर्ण प्रयत्न केले. परंतु त्याला यश मिळालं नाही. लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होऊ शकले नाही'.

विरोधकांवर साधला निशाणा

'काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पार्टी सारख्या पक्षाने स्वार्थी राजकारणाचं नुकसान देशातील महिलांना झेलावं लागलं. महिला आरक्षणाच्या विधेयकाला विरोध करण्याचं काम विरोधकांनी केलं. त्याची त्यांना शिक्षा होईल. विरोधकांनी संविधान निर्मात्यांच्या भावनांचाही अपमान केला आहे, असे पीएम मोदी म्हणाले.

'लोकसभेतील विधेयकावर देशातील कोट्यवधी महिलांचं लक्ष लागलं होतं. महिला आरक्षण विधेयक पडल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यांनी बेंच वाजवला नाही, तर महिलांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि विरोधकांवर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदींनी मागितली महिलांची माफी

'देशातील सर्व माता आणि भगिनींची माफी मागतो. कारण विधेयक मंजूर करण्यास अयशस्वी ठरलो. सरकारसाठी देशहित सर्वोच्च आहे. परंतु काही लोकांना देशापेक्षा स्वार्थ मोठा वाटतो. त्याचं नुकसान भारतातील महिला आणि देशाला भोगावे लागणार आहे, असे मोदींनी पुढे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT