Amit Shah Narendra Modi Death Threat Saamtv
देश विदेश

PM Modi Death Threat: PM मोदी, अमित शहांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांना २ फोन आले अन् सगळी यंत्रणा हादरली

दिल्ली पोलिसांनी धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

PM Modi & Amit Shah Receive Death Threat: केंद्रीय राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांना फोनवरुन ही धमकी देण्यात आली आहे. यानंतर तात्काळ पोलिसांनी सुत्रे हालवत धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीच्या (Delhi Police) बाह्य जिल्हा पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना जीवे मारण्याची धमकी देणारे 2 कॉल आले. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे.

या धमकीनंतर दिल्ली पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला दारूचे व्यसन असून त्याला लवकरच पकडले जाईल, असे सांगितले आहे. तसेच "आम्ही त्यांच्या कुटुंबाकडे पोहोचलो, जिथे कळले की त्याला दारुचे व्यसन असून रात्रीपासून दारू पित आहे. तसेच तो आता घरी नसून त्याला लवकरच अटक करु" असेही पोलिसांनी सांगितले आहे..

दरम्यान, देशातील बड्या नेत्यांना धमकी येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही मार्च महिन्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ज्यामध्ये अंकित मिश्रा नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली होती..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT