Pm Narendra Speech Saam TV
देश विदेश

PM Narendra Speech: भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींचे मणिपूर हिंसाचारावर भाष्य; म्हणाले, काही दिवसांपासून सातत्याने...

PM Narendra Modi Speech For Independence Day 2023: एवढा मोठा देश, माझ्या कुटुंबातील १४० कोटी सदस्य आज स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत, असं मोदी म्हणाले

Ruchika Jadhav

August 15 Independence Day: भारतात आज सर्वत्र मोठ्या उत्साहात ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा होत आहे. लाल किल्ल्यावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी जनतेला संबोधित करत आहेत. यावेळी मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मणिपूरमध्ये (Manipur) काही दिवसांपूर्वी हिंसाचार सुरू होता. मात्र काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहेत. संपूर्ण देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. लोकांनी शांततेत आणि उत्साहाने स्वातंत्र्य उत्सव पुढे न्यावा. शांततेनेच सर्व प्रश्नांवर मार्ग निघेल. केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहतील."

सकाळी ७ वाजता पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरूवात केली.

"जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि लोकसंख्येच्या बाबतीतही आघाडीचा देश भारत आहे. एवढा मोठा देश, माझ्या कुटुंबातील १४० कोटी सदस्य आज स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ", असं मोदींनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT