PM Narendra Modi Speech Saamtv
देश विदेश

PM Modi Speech: 'अखेर तो क्षण आला, मी प्रभू रामांची माफी मागतो, कारण..' पंतप्रधान मोदी भावुक

Ayodhya Ram mandir pran pratishtha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आज आपले प्रभू राम आले म्हणत देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

Gangappa Pujari

PM Narendra Modi Speech:

अयोध्येतील भव्य राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आज आपले प्रभू राम आले म्हणत देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी भावूक..

"आज आपले राम आले आहेत. २२ जानेवारी हा दिवस वर्षानुवर्ष लक्षात राहिलं. आपले राम आता झोपडीत राहणार नाहीत, भव्य मंदिरात राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. तसेच माझं शरीर अजूनही स्पंदीत असून, चित्त प्राणप्रतिष्ठेच्याच क्षणात लीन आहे," असे म्हणत पंतप्रधान काही क्षण भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले.

प्रभू रामांची माफी मागतो..

"मी आज प्रभू रामांची माफी मागतो. आमच्याकडून तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असावी. कारण आपण इतक्या वर्षात हे काम करु शकतो नाही, आज ते पुर्ण झाले. मला विश्वास आहे की प्रभू श्री राम आपल्याला नक्की क्षमा करतील," असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यावेळी म्हणाले.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"आज खूप काही सांगण्यासारखे आहे. हा वियोग केवळ 14 वर्षांचा नाही, तर अयोध्येने शेकडो वर्षांपासून सहन केला आहे. संपूर्ण देश उत्सव साजरा करत आहे. आज संध्याकाळी घरोघरी रामज्योतीची जय्यत तयारी सुरू आहे. गुलामगिरीची मानसिकता झुगारून उभे राहणारे राष्ट्र, भूतकाळातील प्रत्येक दंशातून हिंमत घेणारे राष्ट्र अशा प्रकारे नवा इतिहास घडवत आहे, नवा इतिहास घडत आहे.." असे मोदी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बार्शी - सोलापूर मार्गांवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात

डोळ्यांच्या 'या' बदलाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, असू शकतं मोठ्या आजाराचं संकेत

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

SCROLL FOR NEXT