PM Modi kuwait Visit 
देश विदेश

PM Modi Kuwait Tour: पंतप्रधानांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान,पीएम मोदी 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर'ने सन्मानित

PM Modi kuwait Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 20 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. यापूर्वी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांना हा सन्मान मिळाला होता.

Bharat Jadhav

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतच्या दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी यांच्या दौऱ्याच्या अंतिम दिवशी बायन पॅलेस येथे मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. कुवेतने पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च सन्मान 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' देऊन गौरव केला. बायन पॅलेस हे कुवेतमधील शक्तीचे प्रतीक आहे आणि अनेक देशांचे दूतावासही येथे आहेत.

पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 20 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले असून हे ऑर्डर मित्रतेच्या प्रतिकातून इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांकडून हे सन्मान मिळालेत. परदेशी सार्वभौम आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना पुरस्कृत केले जाते. यापूर्वी ते बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या परदेशी नेत्यांचा सन्मान करण्यात आलाय.

दोन्ही देशांमध्ये अनेक करार होतील

पंतप्रधानांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्याही होणार आहेत. भारत सरकार आखाती देशांशी संबंध दृढ करण्याच्या दिशेने काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्याशी चर्चा केली. यात भारत-कुवेत संबंधांना विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात नवीन चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

कुवेतच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी शनिवारी (21 डिसेंबर 2024) तेथे पोहोचले होते. गेल्या 43 वर्षात भारतीय पंतप्रधानांची या आखाती देशाला झालेली ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी एका भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित केले आणि भारतीय कामगार शिबिरालाही भेट दिली. भारत हा कुवेतच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे. भारतीय समुदाय हा कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात आयटी इंजिनियरनं आयुष्य संपवलं, १५ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra News Live Update: बीड- संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी

वर्षातून फक्त 3 महिनेच मिळतं हे फळ; आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर

Weight Loss Drink: वजन आणि पोटावरील चरबी कमी करायची आहे? मग रोज प्या 'हे' ५ हेल्दी ड्रिंक्स

राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा, पंकजा मुंडेंना बड्या नेत्याकडून थेट ऑफर, राज्याच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT