PM मोदींचा केदारनाथ दौरा; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं अनावरणं (पहा Video) Twitter/@ANI
देश विदेश

PM मोदींचा केदारनाथ दौरा; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं अनावरणं (पहा Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमधील केदारनाथ दौऱ्यावर आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमधील केदारनाथ दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदींनी या ठिकाणच्या सुप्रसिद्ध केदारनाथ मंदिरात त्यांनी भोलेनाथाची पूजा केली आहे. त्यानंतर त्यांनी आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीचं अनावरण देखील केलं आहे. तसेच कार्यान्वित असलेल्या योजनांची माहिती घेतलेली आहे. येथील विकासकामांचा आढावा घेतला आहे. या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी उपस्थित भक्तगणांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.

नरेंद्र मोदींनी आज आपल्या संबोधनाच्या सुरुवातीला जय बाबा केदार अशा घोषणा दिल्या. पुढे ते म्हणाले की, अनेक तिर्थक्षेत्रांवर देशातील संतगण, महंत, वरिष्ठ ऋषीमुनी तसेच अनेक श्रद्धाळू, आज केदारनाथच्या या पवित्र भूमीसोहत प्रत्यक्षात नसेल पण आत्मिक रुपाने आपल्याला आशीर्वाद देत आहेत.

पुढे ते म्हणाले, आदी शंकराचार्यांच्या समाधीच्या पुनर्स्थापनेचे साक्षीदार आपण बनले आहात. हे अलौकिक दृश्य आहे. देश एवढा मोठा आहे. एवढी महान ऋषी परंपरा आहे. भारतात आजही एकापेक्षा एक तपस्वी अध्यात्मिक चेतना जागृत करत असतात. मी फक्त त्यांची नावे घेत बसलो तरी आठवडा लागेल. एखादं नाव घ्यायचं माझ्याकडून राहून गेलं तर आयुष्यभर मी पापाच्या ओझ्याखाली राहिन. त्या सर्वांना मी आदरपूर्वक प्रणाम करतो. यांचे आशीर्वाद आपल्याला शक्ती देतील असे मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT