PM Narendra Modi  Saamtv
देश विदेश

PM Modi: महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना शिक्षा मिळणार, PM मोदींनी दिला थेट इशारा

PM Narendra Modi Warns Opposition Party:

Priya More

Summary -

  • महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर पीएम मोदींनी देशाला संबोधित केले

  • पीएम मोदींनी थेट विरोधकांना इशारा दिला

  • यावेळी त्यांनी देशातील महिलांची माफी मागितली

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. त्यांनी महिला विधेयकाच्या पराभवाला विरोधी पक्षाला जबाबदार धरलं. यावेळी त्यांनी विरोधकांनी नारीशक्ती विधेयक रोखण्याचे पाप केलं आहे याची शिक्षा त्यांना मिळेल असं म्हणत थेट इशारा दिला. यावेळी पीएम मोदी यांनी देशवासियांची माफी देखील मागितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितले की, 'भारताच्या नारीशक्तीला रोखण्यात आलं हे संपूर्ण देश पाहत आहे. नारीशक्ती विधेयक मंजूर झाले नाही. देशातील सर्व महिलांची मी माफी मागतो. काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पार्टी सारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा देशातील महिलांना फटका बसला. देशाची नारी जेव्हा आपल्या क्षेत्रात या नेत्यांना पाहिल तेव्हा तिला आठवेल की याच लोकांनी संसदेत महिला आरक्षण रोखण्याचा जल्लोष केला होता. संसदेत ज्या पक्षांनी नारीशक्ती विधेयकाचा विरोध केला ती लोकं नारीशक्तीला ग्रँटेड घेत आहेत.

पीएम मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. त्यांनी सांगितले की, 'ते विसरत आहेत की २१ व्या शतकातील नारी त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहेत. महिलांना सत्य माहिती आहे. त्यामुळे महिला आरक्षणाला विरोध करून जे पाप विरोधी पक्षाने केले आहे त्याची त्यांना शिक्षा मिळेल. या सर्व पक्षांनी संविधान निर्मात्याचा देखील अपमान केला आहे. हे नारीशक्ती विधेयक कुणाकडूनही काही हिसकावून घेण्यासाठी नव्हते. हे विधेयक सर्वांना काहीना काही देण्यासाठी होते. या विधेयकाद्वारे आमचा २०२९ पासून महिलांना हक्क देण्याचा प्रयत्न होता.'

तसंच, 'नारीशक्ती विधेयकाला विरोध करत विरोधकांनी देशाच्या महिला शक्तीचा गळा दाबला आहे. महिलांची स्वप्न चिरडून टाकली आहेत. सरकारने हे विधेयक आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही. हे विधेयक पडल्यानंतर मला प्रचंड दु:ख झाले. हा प्रयत्न यशस्वी झाला नाही त्यामुळे मी सर्व महिलांची माफी मागतो. सरकारसाठी राष्ट्रीय हित सर्वोत्तपरी आहे. जेव्हा काही व्यक्ती राष्ट्रीय हितापेक्षा पक्षीय हिताला प्राधान्य देतात तेव्हा त्याचे परिणाम महिला आणि देश या दोघांना भोगावे लागतात.' , असे पीएम मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Withdrawal Facility : PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! PF काढण्याची पद्धत बदलणार, महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता; राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्षाची साथ सोडणार?

केस गळणं म्हणजे कॅन्सरचं लक्षणं? घाबरण्यापूर्वी ही माहिती वाचा

Sunil Grover: फुटपाथवर झोपलेला दिसला प्रसिद्ध अभिनेता; व्हिडिओ पाहून चाहते हैरान, म्हणाले, 'अहंकार नसल्यावर...'

मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, जीएसटी विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT