PM Narendra Modi is world most popular leader highest approval ratings morning consult Saam TV
देश विदेश

World Most Popular Leader: पंतप्रधान मोदींचा जगभरात डंका, ठरले सर्वात लोकप्रिय नेते; दुसऱ्या क्रमांकावर कोण?

PM Narendra Modi News: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत.

Satish Daud

World Most Popular Leader PM Narendra Modi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. मॉर्निंग कंसल्टच्या सर्व्हेत मोदींना सर्वाधिक ७६ टक्के इतके रेटिंग मिळाले आहे. या सर्व्हेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४१ टक्के रेटिंग मिळालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसरीकडे अध्यक्ष जो बायडेन लोकप्रिय नेत्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. बायडेन यांना ३७ टक्के रेटिंग मिळाली आहे. मॉर्निंग कंसल्टने २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत सर्व्हे करून डेटाच्या आधारे ही माहिती दिली आहे.

महत्वाची बाब म्हणजे, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचे डिसअप्रूव्हल रेटिंगही इतर नेत्यांच्या तुलनेत कमी आहे. ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाचे बाब आहे. मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरताच भाजप नेत्यांनी ठिकठिकाणी पेढे वाटत आनंद साजरा केला आहे.

पंतप्रधान मोदीनंतर दुसऱ्या क्रमांकावर मॅक्सिकोचे अध्यक्ष ओब्राडोर असून त्यांना ६६ टक्के इतके रेटिंग मिळाले आहे. तर तिसऱ्या क्रमाकांवर स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती अलेन बारसेट, चौथ्या क्रमांकावर ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा आणि पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना पसंती मिळाली आहे.

रेटिंग कशी काढली जाते?

जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी वेगवेगळ्या देशांतील प्रौढ लोकसंख्येच्या रेटिंगच्या आधारे काढली जाते. तसेच, प्रत्येक देशातील सॅम्पल साईज वेगळी असते.मॉर्निंग कंसल्ट ही संस्था प्रत्येक आठवड्यात लोकप्रिय नेत्यांची रेटिंग जाहीर करते. या रेटिंगमध्ये मोदी सातत्याने अव्वल स्थानावर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT