Narendra Modi Saam Tv
देश विदेश

PM Modi आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वी विकासाचा 'बूस्टर डोस' देणार

पंतप्रधान आज मेहसाणातील मोढेरा येथून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

वृत्तसंस्था

Narendra Modi Gujarat Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आजपासून ते 11 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसीय गुजरात (Gujarat) दौऱ्यावर आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी 11 ऑक्टोबरला मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान आज मेहसाणातील मोढेरा येथून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. येथे ते सायंकाळी साडेपाच वाजता विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. सायंकाळी 6.45 वाजता मोढेश्वरी माता मंदिरात दर्शन व पूजा, साडेसात वाजता सूर्यमंदिराचे दर्शन घेणार. (PM Modi Gujarat Visit)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 10 ऑक्टोबरचा दौराही व्यस्त असणार आहे. भरूचमध्ये सकाळी 11 वाजता ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. दुपारी 3.15 वाजता मोदी अहमदाबादमधील शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन करतील. यानंतर ते जामनगरमध्ये सायंकाळी 5.30 वाजता विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. (Tajya News)

पंतप्रधान 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:15 वाजता अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटल असरवा येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील, त्यानंतर ते मध्य प्रदेशला रवाना होतील. तेथे पोहोचल्यानंतर ते उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात जाणार आहेत. यानंतर ते संध्याकाळी 6.30 वाजता श्री महाकाल लोक राष्ट्राला समर्पित करतील आणि सायंकाळी 7.15 वाजता उज्जैनमध्ये सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांविरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT