Prime Minister Narendra Modi has urged citizens to save petrol and diesel, avoid buying gold 
देश विदेश

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

PM Modi Appeals : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे, सार्वजनिक वाहतूक व कारपूलिंगचा अवलंब करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

Bharat Jadhav

  • पीएम मोदींचं पेट्रोल-डिझेल बचतीचं मोठं आवाहन.

  • वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसवर भर.

  • स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचा सल्ला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा देशाला पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्याचे आवाहन केले आहे. यासह त्यांनी लोकांना सोने न खरेदी करण्याचे आणि तेलाचा वापर कमी करण्यासह ऑनलाईन क्लासेस आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

याआधी पंतप्रधान मोदींनी हैदराबादमध्ये बोलताना देशातील नागरिकांनी कोरोना काळात घेतलेल्या उपाययोजनांची पुन्हा एकदा अंमलबजावणी करावी, असं म्हटलं होतं. आता गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोदींनी देशातील जनतेला पुन्हा आवाहन केले आहे. याआधी पंतप्रधान मोदींनी हैदराबादमध्ये बोलताना देशातील नागरिकांनी कोरोना काळात घेतलेल्या उपाययोजनांची पुन्हा एकदा अंमलबजावणी करावी, असं म्हटलं होतं. आता गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोदींनी देशातील जनतेला पुन्हा आवाहन केले आहे.

आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी लोकांना सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले. विदेशी उत्पादनांऐवजी स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्यावर भर दिला. त्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहनही केले.

पंतप्रधानांनी नमूद केले की, गेल्या काही वर्षांपासून जग अनेक संकटांचा सामना करत आहे. प्रथम, कोविड-१९ महामारी, त्यानंतर आर्थिक अस्थिरता आणि आता पश्चिम आशियातील वाढते युद्ध. त्यांच्या मते, जर कोरोना विषाणू हे या शतकातील सर्वात मोठे संकट होते, तर पश्चिम आशियातील सध्याचा संघर्ष या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

६ मतदारसंघ, एकच लक्ष्य; बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम, संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

SCROLL FOR NEXT