PM Narendra Modi’s video message on student protests sparks political debate as questions rise over police action saam tv
देश विदेश

पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांना माफी, पोलीस आंदोलकांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

Pm Modi Apology Students Protest Police Cases: पंतप्रधान मोदींचा नवा इन्स्टा व्हिडिओ आलाय. या व्हिडिओत ते आंदोलक विद्यार्थ्यांबाबत काय बोलले आहेत? त्यांच्या भूमिकेवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके साम टीव्हीच्या विशेष मुलाखतीत काय म्हटले? मोदींची सूचना पोलीस ऐकणार का? यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Suprim Maskar

दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करणाऱ्या रुचिका सिंहवर नोएडात एफआयआर दाखल झाली.... ही एफआयआर दाखल झाल्यानंतर रात्री उशीरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना आवाहन करत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला... या व्हिडिओ पंतप्रधानांनी तरुणांच्या चुकीबद्दल त्यांना माफ केल्याचं आणि विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाई न करण्याची भूमिका मांडली...तर दुसरीकडे ट्रोल झालेल्या रुचिका सिंहनेही व्हिडिओद्वारे पंतप्रधानांची जाहीर माफी मागितली...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याची भूमिका मांडलेली असताना रुचिकावर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे CJPच्या अभिजित दिपकेंनी भाजपवर निशाणा साधला... शिवीगाळ करणं गुन्हा असेल तर सर्वाधिक गुन्हे भाजप IT सेलवर दाखल होतील, असा टोला दिपकेंनी लगवला...

पंतप्रधानांनी माफ केलं असलं तरी आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सरकारनं कुठलीच पावलं उचलली नाहीत...तर दुसरीकडे ऑनलाईन माफ केलं मात्र गुन्हे कधी मागे घेणार असा सवाल साम टिव्हीच्या ब्लॅक अँण्ड व्हाईट मुलाखतीतही दिपकेंनी उपस्थित केलाय. तर लाठीचार्ज केल्याबद्दल आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची माफी कधी मागणार असा सवाल ठाकरे बंधूंनी मोदींना केलाय़.

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय... रुचिका सिंहनं तर जाहीर माफी मागूनही तिच्यावर 352, 353, 356 सारखी गंभीर कलमं लावली आहेत...तसंच विविध राज्यांमध्येही पोलिसांक़डून कारवाई सुरूच आहे. मात्र आता पंतप्रधानांनीच थेट माफ केल्यामुळे पोलीस गुन्हे मागे घेऊन कारवाई थांबवणार का? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - उत्तर सोलापूर तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी अंतिम टप्प्यात

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT