PM Modi Warns on women reservation bill saam tv
देश विदेश

Women reservation bill: पंतप्रधान मोदी कडाडले; विरोधकांना कडक शब्दांत इशारा, कॅबिनेट बैठकीत काय काय म्हणाले?

pm modi reaction women reservation bill failure lok sabha : महिला आरक्षण विधेयक काल, शुक्रवारी लोकसभेत विरोधकांच्या विरोधामुळं मंजूर होऊ शकलं नाही. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Nandkumar Joshi

संसदेच्या विशेष अधिवेशनात शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर मतदान घेण्यात आले. त्यात सत्ताधारी पक्षाला दोन तृतियांश बहुमत सिद्ध करता आलं नाही. लोकसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विरोधात मतदान केल्यानं संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं. (Women Reservation Bill Rejection in Loksabha) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, कॅबिनेटच्या बैठकीत विरोधी पक्षांवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. महिलांना २०२९ पासून लोकसभा आणि विधानसभांमध्ये आरक्षण देणारे विधेयक नामंजूर करून विरोधकांनी मोठी चूक केली आहे. देशातील महिला त्यांना कधीच माफ करणार नाहीत. विरोधकांना याचे परिणाम भोगावे लागतील, असे मोदी म्हणाले. (pm modi reaction women reservation bill failure)

सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर नाराजी व्यक्त केली. विरोधकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. महिलांना याचं उत्तर द्यावे लागले. (PM Modi Warn Opposition Over Women Bill Defeat) त्यांनी देशातील महिलांना नाराज केले आहे. हा संदेश प्रत्येक गावात, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लोकसभेत बहुमत मिळू शकलं नाही

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाराजी स्पष्टपणे दिसून आली आहे. त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. १३१ वी घटनादुरुस्ती विधेयकाचा उद्देश हा लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवणे हा होता. मात्र, लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यात सत्ताधारी भाजप आणि एनडीएतील पक्ष अपयशी ठरले. लोकसभेत मांडलेल्या या घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाजूने २९८ मते मिळाली. तर विरोधात २३० मते पडली. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही.

प्रियांका गांधींचं केंद्र सरकारलाच आव्हान

लोकसभेत महिलांना आरक्षण देणारं घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी यांनी सरकारला थेट आव्हान दिले. (Priyanka Gandhi Challenges Centre Over Women Reservation Bill) २०२३ मध्ये सर्व पक्षांनी ज्या विधेयकाला पाठिंबा दिला होता ते सोमवारी सरकारने मांडावे. सोमवारी संसदेचे अधिवेशन बोलवावे, आम्ही त्या विधेयकाला पाठिंबा देऊ, असे प्रियांका म्हणाल्या. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर केला. महिलाविरोधी असल्याचा आरोप विरोधकांवर केला जात आहे. पण प्रत्यक्षात तसं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढील ३ दिवस महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पडणार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यासहित भाजपच्या महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात; घटनास्थळी तगडा बंदोबस्त, VIDEO

Maharashtra News Live Update: त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी SIT ची स्थापना

मुंबई हादरली! नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला; हात अन् चेहर्‍यावर धारदार शस्त्राने वार

Child Vitamin Deficiency: मुलांच्या चेहऱ्यावरील ५ गंभीर लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; असू शकते या व्हिटॅमिन्सची कमी

SCROLL FOR NEXT