पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर नवा व्हिडिओ पोस्ट करत, देशवासियांना महत्वाचं आवाहन केले आहे.  saam tv
देश विदेश

PM Modi instagram video : PM मोदींनी पोस्ट केला नवा व्हिडिओ; संपूर्ण देशाला केलं मोठं आवाहन

PM Modi Instagram video on Har Ghar Tiranga campaign : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केलाय. यात पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भात देशवासियांना मोठं आवाहन केलंय.

Nandkumar Joshi

Narendra Modi new Instagram video Independence Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मोदींनी देशातील जनतेला मोठं आणि महत्वाचं आवाहन केलं आहे. घराघरात तिरंगा फडकवा, असं ते म्हणाले.

येत्या १५ ऑगस्टला देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान सुरू आहे. (Har Ghar Tiranga campaign 2026 PM Modi appeal) देशाच्या वेगवेगळ्या भागात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यासंदर्भात एक व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे.

काय म्हणाले मोदी?

PM मोदी म्हणाले, 'चला तर मग, १५ ऑगस्ट अभिमानानं साजरा करूया. स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहा. विकसित भारताचा संकल्प करा. घरोघरी तिरंगा, मनामनात तिरंगा...प्रत्येक घरी तिरंगा फडकवा.'

तत्पूर्वी, एनडीएच्या खासदारांची साप्ताहिक बैठक मंगळवारी झाली होती. त्यात खासदारांनी तिरंगा फडकावून वंदे मातरम, भारत माता की जय असा जयघोष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं होतं.

'हर घर तिरंगा' मोहीम

'हर घर तिरंगा' मोहिमेची सुरुवात २०२२ मध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत करण्यात आली होती. देशातील कोट्यवधी नागरिक स्वच्छेने राष्ट्रध्वज फडकवतात. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे आणि देशासाठी नेहमी सर्वोत्तम देण्याची निरंतर प्रेरणा आहे. चला, आपण 'हर घर तिरंगा' मोहिमेत उत्साहाने सहभागी होऊया आणि 'विकसित भारता'च्या निर्मितीत योगदान देण्याचा आपला सामूहिक संकल्प करू या, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींचे इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स किती?

गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर पंतप्रधान मोदींचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. नीट परीक्षेच्या मुद्द्यावर पोस्ट केलेल्या व्हिडिओने २४ तासांत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओचा विक्रम नोंदवला होता. या व्हिडिओला ४०० मिलियनहून अधिक व्ह्यूव्ज आले आहेत. पीएम मोदी हे इन्स्टाग्रामवर जगभरात सर्वाधिक फॉलो केले जाणारे सक्रिय नेते आहेत. या प्लॅटफॉर्मवर त्यांचे १०६ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पीएम मोदींचे १०७ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीच्या कुपवाड शहरासह तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊसाची दमदार हजेरी

Mumbai Crime: दारू पार्टीत चेष्टा केल्याचा राग डोक्यात गेला, झोपलेल्या मित्राला जागीच संपवलं

शिंदेंनी डाव टाकला; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने असंख्य कार्यकर्त्यांसह हाती घेतलं धनुष्यबाण

Vastu Shastra: दुसऱ्यांचे कपडे आणि चप्पल घातल्याने काय होते?

सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर?

SCROLL FOR NEXT