PM Modi Parliament Speech Sansad TV
देश विदेश

PM Modi Speech : "तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं..." पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर पलटवार

PM Modi Speec In Loksabha : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत.

Chandrakant Jagtap

PM Modi Parliament Speech: लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावेळी आभारासोबतच मला राष्ट्रपतींचे अभिनंदनही करायचे आहे. प्रजासत्ताकाचे प्रमुख म्हणून त्यांची उपस्थिती केवळ ऐतिहासिकच नाही, तर देशातील कोट्यवधी मुलींसाठी प्रेरणादायी संधीही आहे.

राहुल गांधींवर मोदींचा पलटवार

लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मोदी म्हणाले, इथल्या चर्चेत प्रत्येकाने आपापले आकडे आणि युक्तिवाद दिले. आपापल्या आवडी, प्रवृत्ती आणि स्वभावानुसार मुद्दे मांडले. या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला की लक्षात येते की कोणाची किती क्षमता, योग्यता आणि हेतू काय आहे? देश या सर्वांचे मूल्यमापन करत असतो.

"काल काही लोक आनंदाने उड्या मारत होते"

पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु झाले तेव्हा त्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणावर पलटवार केला. 'मी काल पाहत होतो. काही लोकांच्या भाषणानंतर काही लोक आनंदाने उड्या मारत होते. त्यांना चांगली झोप लागली असावी. आज ते वेळेवर उठूही शकले नाही', असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला. यानंतर बोलताना ते म्हणाले की, 'ये कह कह के हम दिल को बहला रहे हैं', वो अब चल चुके हैं... वो अब आ रहे है.

"काही लोकांमध्ये हार्वर्ड स्टडीची मोठी क्रेझ"

विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही लोकांना हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेझ आहे. हार्वर्डमध्ये एक अभ्यास करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाचा उदय आणि पतन हा या अभ्यासाचा विषय आहे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर पलटवार केला. यावेळी त्यांनी दुष्यंत कुमार यांच्या गझलमधील 'तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यक़ीन नहीं, या दोन ओळी देखील वाचल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Marathwada Floods : बँकांनीही आवळला शेतकऱ्याभोवती फास; सरकारी बँकांचा, सावकारी कारभार, VIDEO

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

SCROLL FOR NEXT